प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड-19 वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी तुफान दगडफेक करीत रुग्णवाहिका पेटविली. वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, यशोधा वंटगोडी, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आदी अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
कोविड-19 वॉर्डसमोर तैनात करण्यात आलेल्या पोलीस व बिम्सच्या सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करून जमावाने त्यांना पिटाळले आहे. या घटनेनंतर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी धास्तावले असून कोरोना विरुद्ध लढणाऱया योद्धय़ांवर हल्ले झाले तर आम्ही कसे काम करायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासंबंधी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, श्वसनाचा त्रास जाणवल्याने घी गल्ली येथील एका 55 वषीय रहिवाशाला 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्स प्रशासनाने सर्जिकल ब्लॉकमधील क्वारंटाईनमध्ये त्याला ठेवले होते. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. या वॉर्डमध्ये हलविल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
घी गल्ली येथील रहिवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना समजली. थोडय़ावेळात त्यांचे अन्य नातेवाईकही सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दाखल झाले. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांना शिवीगाळ करत त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. याचवेळेला अथणीहून आलेली एक रुग्णवाहिका कोविड वॉर्डसमोर उभी होती. ही रुग्णवाहिका पेटविण्यात आली.
कोविड वॉर्डपासून हाकेच्या अंतरावर केए 22 पी 1203 क्रमांकाची कार उभी करण्यात आली होती. ही कार डॉ. प्रियांका मेटगुड यांची आहे. त्या जीवनरेखा इस्पितळात रुग्ण तपासण्यासाठी गेल्या होत्या. परत येईपर्यंत त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. कारमध्ये पेट्रोलने भरलेली बाटली फेकून पेटविण्याचाही प्रयत्न झाला आहे. याच मार्गावर दुसऱया बाजूला असणाऱया केए 22 जी 0655 क्रमांकाचे कारागृह विभागाचे वाहन फोडण्यात आले आहे. तेथून जवळच केए 22 झेड 5666 क्रमांकाची पत्रकार राजेसाब नदाफ यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली आहे. अचानक दगडफेकीला सुरुवात होताच वैद्यकीय कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी तेथून पळ काढला. तातडीने त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलालाही माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान दोन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्मयात आणली तरी तोपर्यंत रुग्णवाहिका संपूर्णपणे जळाली होती.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी, खडेबाजारचे एसीपी एम. चंद्राप्पा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस निरीक्षक मुत्तन्ना सरवगोळ आदी अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. या अधिकाऱयांनी दगडफेक व जाळपोळ घटनेच्या संबंधी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हल्ले नको पाठबळ द्या-जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ
या घटनेसंबंधी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका पेटविणे, दगडफेक करणे, वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ले करण्याचे प्रकार पूर्णपणे चुकीचे आहेत. घी गल्ली येथील रहिवाशाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने आदी सारी रुग्णांवर उपचार करणाऱया विभागात त्याला दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी कोविड वॉर्डमध्ये हलविण्यात आले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे. डॉक्टरांवर हल्ले करण्यापेक्षा आपला जीव धोक्मयात घालून रुग्णसेवा बजाविणाऱया कोरोना योद्धय़ांना पाठबळ द्या, असे सांगतानाच दगडफेक, जाळपोळ प्रकरणांतील पुंडांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
कायद्याचा हिसका दाखविणार-पोलीस आयुक्त के. त्यागराजन
दगडफेक व रुग्णवाहिका पेटविणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी दिला आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ले करणे चुकीचे आहे. या घटनेसंबंधी संपूर्ण माहिती घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना घटना-लक्ष्मण निंबरगी
यांचा फोटो वापरणे
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी रात्री कोविड-19 परिस्थितीसंबंधी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होती. त्यावेळी जिल्हय़ातील सर्व वरि÷ अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. नेमके याचवेळेला रुग्णवाहिका पेटविल्याची माहिती अधिकाऱयांना मिळाली. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला असता व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना ही माहिती मिळाली. आम्ही सारे वरि÷ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातच होतो. तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
40 जणांचा जमाव, घटना पूर्वनियोजित?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 30 ते 40 जणांच्या जमावाने हे कृत्य केले आहे. पेट्रोलच्या बाटल्या टाकून वाहने पेटविल्याचा प्रकार लक्षात घेता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता दंगल माजविणारे नेमके किती जण होते, याची माहिती मिळविण्यात येत आहे. संपूर्ण चौकशी केल्यानंतरच रुग्णवाहिका पेटविणारे कोण होते, त्यांना कोणी बोलावून घेतले? याचा उलगडा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.









