घरीविलगीकरणातराहणाऱयारुग्णांचीत्वरितमाहितीमिळतनसल्यानेअडचण
प्रतिनिधी/ मडगाव
राज्याच्या आर्थिक राजधानीतील कोविडबाधितांमध्ये दैनंदिन वाढ होत असताना मडगाव पालिकाही अडचणीत सापडली आहे. घरातच विलगीकरणात राहण्यास प्राधान्य देणाऱया रुग्णांचा जैव-वैद्यकीय कचरा गोळा करण्याच्या बाबतीत पालिकेला समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालिकेने कामगारांचे एक पथकच रुग्णांच्या घरांतून जैव-वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलले असून त्यांच्याकडून अशा कचऱयाची उचलही केली जात असते. परंतु असा जैव-वैद्यकीय कचरा हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्याप जाग्यावर पडलेली दिसून येत नाही.
पालिकेला ज्यांनी घरी विलगीकरणात राहण्यास प्राधान्य दिले आहे अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांची यादी ताबडतोब प्राप्त होत नसल्याने कचरा उचल करणे शक्मय होत नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. कोणत्याही पथकाच्या अनुपस्थितीत जैव-वैद्यकीय कचरा अन्य दैनंदिन सामान्य कचरा गोळा करणाऱया कामगारांच्या हातात पडल्यास त्यांना व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी तातडीने यासंदर्भात उपाययोजना आखताना पालिकेला घरीच विलगीकरणात राहण्यास प्राधान्य देणाऱया रुग्णांची यादी तत्काळ त्याचदिवशी मिळेल अशी व्यवस्था केल्यास जैव-वैद्यकीय कचरा उचल योग्य प्रकारे राबविणे शक्मय होईल, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका अधिकाऱयाने दिली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कचरा गोळा केला, तरी विल्हेवाटीअभावी समस्या
त्याचप्रमाणे कोविडबाधित रुग्णांच्या घरातून कचरा गोळा केल्यानंतरही पालिकेला समस्यांचा सामना करावा लागला आहे. कचऱयाची विल्हेवाट लावणे शक्मय होत नसल्याने या समस्या उद्भवल्या आहेत. आठवडाभरापूर्वी कोविडविषयक जैव-वैद्यकीय कचरा असलेली पिकअप व्हॅन हॉस्पिसियो इस्पितळामध्ये गेली असता तेथे प्रवेश नाकारला होता. नंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात सदर कचरा विल्हेवाट लावण्यासाठी नेला असता तेथूनही व्हॅन परत आली होती. गोमेकॉतील इन्सिनरेटर नादुरुस्त असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिकेला पिकअप व्हॅनमध्येच हा कचरा साठवून ठेवावा लागला होता. दरम्यान, जीएमसीचे डीन शिवानंद बांदेकर यांनी तीन दिवसांपूर्वी मडगावातील जिल्हा इस्पितळाला भेट दिली असता गोमेकॉने नादुरुस्त इन्सिनरेटर दुरुस्त केले आहेत आणि काम सुरू केले आहे, असे स्पष्ट केले होते.









