प्रतिनिधी/ बेळगाव
रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली देवदेवतांचे जुने फोटो व मूर्ती ठेवण्यात येत आहेत. फाटलेले फोटो व तुटलेल्या काचा असे चित्र येथे पहावयास मिळत आहे. यातून देवदेवतांची विटंबना होत असून असे फोटो त्वरित हलवावेत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
घरात खराब झालेले देवतांचे फोटो जागा मिळेल तिकडे ठेवण्यात येत आहेत. काहीवेळा रस्त्याच्या व कचऱयाच्या शेजारीही असे फोटो ठेवण्यात आल्याचे दृष्टीस पडत आहे. यामुळे देवतांची विटंबना होत आहे. त्यामुळे जीर्ण झालेले फोटो भाविकांनी फोटो व काच, प्रेम वेगळे करून फोटोचे विधिवत विसर्जन केल्यास असे प्रकार घडणार नाहीत. असे फोटो दिसल्यास ते त्वरित दुसरीकडे हलवावेत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.









