वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध अब्जाधीपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील आपल्या विमान इंधन स्थानकांची संख्या 50 टक्क्मयांनी वाढविणार असल्याची माहिती आहे. सध्या कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार सलग 52 महिन्याच्या आकडेवारीवरुन विकासाच्या दिशेने भक्कम प्रवास सुरु केला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यासोबतच हवाई क्षेत्रात सलग पाचव्या वर्षातही भारत जगातील सर्वात वेगाने विकास करणारा देश बनला आहे. रिलायन्स यामध्ये आपला लाभ उठविण्याच्या तयारीत असून स्टेशन्सची संख्या वाढवण्यावर आगामी काळात भर देणार आहे.
वार्षिक अहवालानुसार आपल्या मजबूत नेटवर्क, कमीत कमी कालावधी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष सुविधा देण्याच्या जोरावर रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील बाजारात आपले मूल्य अधिक मजबूत केले आहे. देशाच्या 20 टक्के विमातळावर रिलायन्स एव्हीएशनची सर्वाधिक बाजारात हिस्सेदारी जमा केली आहे. कंपनी 45 ठिकाणी आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची तयारी करत आहे.
देशातील विमान इंधन स्टेशन्स
भारतामध्ये सध्या 256 विमान इंधन स्टेशन्स आहेत. यामध्ये 119 स्टेशन्स इंडियन ऑईल कॉर्पोरेशन्सची आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनजवळ 61 स्टेशन्स असून अन्य 44 स्टेशन्स ही हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची आहेत. ताज्या आकडेवारीनुसार 31 स्टेशन्ससह रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी किरकोळ इंधन कंपनी आहे.