बिग बाजार स्टोअर्स रिलायन्सकडे ः 30 हजार कर्मचारी घेणार
नवी दिल्ली/ मुंबई
ऍमेझॉन आणि फ्युचर यांच्यात चाललेल्या कराराअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रिजने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने फ्युचर रिटेल स्टोअर्सचा ताबा आपल्या हाती घेतला आहे. सध्याला फ्युचर रिटेलची ऍमेझॉनसोबत व्यवसाय विक्री संदर्भात न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई सुरु असतानाच रिलायन्सकडून ही कार्यवाही झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स रिटेलने फ्युचर रिटेल अंतर्गत येणाऱया बिगबाजारसारख्या स्टोअर्सवर कब्जा मिळविण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. आपल्या ब्रँड स्टोअर्सच्या माध्यमातून फ्युचर रिटेलच्या कर्मचाऱयांना रिलायन्सने नोकरीवर घेण्यास सुरुवात केल्याचे समजते. परंतू ऍमेझॉनने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या व्यवसाय खरेदीच्या व्यवहारानंतर जमीन मालकांनी रिलायन्सशी संपर्क साधला. कारण फ्युचर रिटेलने भाडे रक्कम भरलेली नाही. यानंतर रिलायन्सने जमीन मालकांसोबत भाडे करारावर हस्ताक्षर करून फ्युचर रिटेल लिमिटेडला चालवायला दिले असल्याचे सांगितले जाते.
कर्मचाऱयांना सामावून घेणार
यायोगे रिलायन्स येणाऱया काळामध्ये 30 हजारहून अधिक स्टोअर कर्मचाऱयांना पुन्हा नोकरीमध्ये सामील करून घेणार असल्याचे सांगितले जाते.









