वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कार्यरत असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडून ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉनडॉटइनला आपल्या रिटेल व्यवसायातील जवळपास 1.47 लाख कोटांच्या हिश्याची ऑफर देण्याचे संकेत व्यक्त होत आहेत, अशी माहिती ब्लूमबर्गच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.
सदर माहितीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या रिटेल व्यवसायातील जवळपास 40 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा पर्याय ऍमेझॉनसमोर ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी काळात जर सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यास रिलायन्सला आपल्या रिटेल व्यवसायातील 40 टक्क्मयांचा वाटा हा ऍमेझॉनला द्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
ऍमेझॉनने पुढाकार घेतल्यास हा व्यवहार पूर्ण झाल्यास ऍमेझॉनसोबतचा रिलायन्सचा हा व्यवहार सर्वात मोठा व्यवहार म्हणूनही नोंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदरच्या बातमीमुळे गुरुवारी शेअर बाजारात रिलायन्सचे समभाग जवळपास 4 टक्क्मयांनी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.









