देशात जिओची ग्राहक संख्या 41 कोटीपेक्षा अधिक : ट्रायकडून आकडेवारी सादर, इतर कंपन्या मागे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची ग्राहक संख्या ही सध्या 41 कोटीच्या घरात पोहोचली असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून दूरसंचार क्षेत्रात प्राप्त केलेले स्थान आणखी मजबूत होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
रिलायनस जिओने फेब्रुरवारी 2021 मध्ये आपल्या नेटवर्कसोबत जवळपास 42 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर दुसऱया बाजूला 15 महिन्यांच्या कालावधीनंतर व्होडाफोन-आयडिया नवीन ग्राहक जोडण्यात यशस्वी ठरले आहेत. एअरटेलने 58 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तसेच त्याच्या पुढच्या महिन्यात एअरटेलने 37 लाख नवे ग्राहक जोडले. म्हणजे दोन महिन्याच्या दरम्यान कंपनीला एकूण 95 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत.
शेतकरी आंदोलनाचा जिओला फटका
उत्तर भारतामध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. परंतु या अदोलनापासूनच रिलायन्स जिओच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने नवीन ग्राहक जोडण्यात झाला होता. सध्या हे आदोलनाचे वातावरण शांत होत असल्याने ग्राहकांचा कल पुन्हा जिओकडे वळत अल्याचेही ट्रायच्या माहितीमधून सांगितले आहे.
रिलायन्स जिओला दर कमी ठेवल्याचा लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येते. तथापि, आपली सेवा इतर कंपन्यांच्या तोडीस तोड असल्याचा जिओचा दावा आहे.
जिओ-एअरटेलचे समभाग तेजीत
ट्रायच्या माहितीनुसार फेब्रुवारी 2021 मध्ये विविध दूरसंचार कंपन्यांनी एकूण 82 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. महिन्याच्या आधारे वाढ पाहिल्यास यामध्ये ग्रामीण विभागामध्ये एकूण 0.44 टक्के आणि शहरी विभागात 0.94 टक्क्याची वाढ नोंदवली आहे. याच दरम्यान जिओ आणि एअरटेलचे समभाग तेजीत राहिले आहेत. यात जिओचे समभाग 35.43 ते 35.54 टक्क्यांनी वाढले असून एअरटेलचे समभाग 29.72 ते 29.83 टक्क्य़ांनी मजबूत राहिले आहेत.









