नवी दिल्ली :
चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमीचा नवा नारजो 20 सिरीजचा स्मार्टफोन येत्या 21 सप्टेंबरला भारतीय बाजारात उतरवला जाणार आहे.
यासंबंधीची घोषणा कंपनीने नुकतीच अधिकृतपणे केली आहे. नारजो 20 सिरीजमधील फोनची घोषणा याच महिन्यात सुरूवातीला बर्लिन येथे आयोजीत आयएफएच्या कार्यक्रमात करण्यात आली होती. नारजो 20 ए, नारजो 20 आणि नारजो 20 प्रो हे तीन फोन्स कंपनी सादर करणार आहे. हे फोन्स नारजो 10 आणि नारजो 10 ए यांचे स्थान घेतील. नारजो 20 ए 3 जीबी रॅम-32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम-64 जीबी स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. व्हिक्ट्री ब्ल्यू, ग्लोरी सिल्वर या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.









