नवी दिल्ली : राजस्थानमधील बरातपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने भारताची 17 वर्षीय महिला मल्ल रितिका फोगटने आत्महत्या केली आहे. भारताच्या अव्वल महिला मल्ल गीता फोगट आणि बबिता फोगट यांची रितिका ही मामे बहीण आहे.
राजस्थानमधील सदर स्पर्धा 12 ते 14 मार्च दरम्यान आयोजित केली होती. या स्पर्धेत 17 वर्षीय रितिकाला अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लाकडून केवळ एका गुणाने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे निराश झालेल्या रितिका फोगटने सोमवारी 15 मार्च रोजी रात्री आत्महत्या केली.









