हाथरस येथील आरोपींना फाशी द्या
अक्कलकोट / प्रतिनिधी
उत्तर प्रदेश येथील हाथरस ( जिल्हा चंपारण्य ) येथे दलित समाजातील मनिषा वाल्मिकी या भगिनीवर अमानुष पाशवी बलात्कार केलेल्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा द्या अन्यथा योगी सरकार हटवुन राष्ट्रपती राजवट लागू करावे तसेच काँग्रेस चे जेष्ठ नेते राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा ही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. आणि आरोपी ना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे वतीने आज तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली.
उत्तर प्रदेश मधील संतापजनक घटना हाथरस जिल्ह्यातील चंपारण्य गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 14 सप्टेंबर रोजी चार नराधमांनी दलित एका भगिनीवर सामुहिक पाशवी बलात्कार करून तिच्याच ओढणीनीने गळा दाबून आणि जिभ कापुन पाठीचा मणका मोढले, इतक्या अमानुष व भयंकर पद्धतीने जिवे मारण्याचा प्रयत्न केले मृत्युशी झुंज देत पिडितेने 29 सप्टेंबरला प्राण सोडला आहे.
एवढ्या अमानुषपणे खुन केले यांवरून असे गैरकृत्य करतांना कुठलीही धाक राहिलाच नाही का ? या घटनेची जलद गतीने न्यायालयात खटला चालवून दोषींना फाशी द्यावे आणि पालघर साधुंच्या हत्याकांडात पुढाकार घेणा-या योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील माता भगिनीच्या सुरक्षेकडे देखील लक्ष द्यावे आणि जर लक्ष देणे होत नसल्यास खुर्ची खाली करावे आशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेस विधानसभा अक्कलकोट वतीने तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर युवक अध्यक्ष मुबारक कोरबु यांच्या मार्गदर्शन खाली तहसीलदार अंजली मरोड यांना आज देण्यात आले, याच वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्का बुक्कीचा यावेळी बाबासाहेब पाटील यांनी तीव्र निषेध केला.
यावेळी वसिम कुरेशी, बसवराज अलोळी, जगदीश चव्हाण,साहील पटेल, केदार बिराजदार, हमिद गिलकी, प्रविण गुडंरगी,शिवराज जकापुरे, प्रकाश जमादार, सोनु बिराजदार, समर्थ माळी, शाम चिकमळ, महादेव चुंगी व अन्यजण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









