क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिह्यातील रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 15 स्केटर्सची 59 राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये स्पीड स्केटिंग आणि फ्री स्टाईल स्केटिंग, रोलर आणि इनलाइन हॉकी, अल्पाइन आणि इतर रोलर विविध गटात घेण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा मोहाली, पंजाब येथे 11 ते 21 डिसेंबर दरम्यान पंजाब येथे पार पडणार आहे. जिह्यातील खालील स्केटिंगपटूंची निवड झाली आहे. स्पीड स्केटिंगमध्ये अवनीश कामण्णावर, आराध्या पी., फ्री स्टाईल स्केटींगमध्ये अवनीश कोरीशेट्टी, देवेन बामणे, अभिषेक नवले, प्रीती नवले, जयध्यान राज, अल्पाइन स्केटीगमध्ये, अमेय याळगी, इनलाइन हॉकी स्केटींगमध्ये साईराज मेंडके, यशोवर्धन परदेशी, यशपाल पुरोहित, मंजुनाथ मंडोळकर, भक्ती हिंडलगेकर, अक्षता सावंत, रोलर हॉकी स्केटींगमध्ये शर्वरी साळोखे यांची निवड झाली आहे.
केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक, रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग रिंकवर सर्व स्केटिंगपटू सराव करत असून त्यांना माजी खा. डॉ प्रभाकर कोरे, माजी आम. शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे तर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, अनुष्का शंकरगौडा विठ्ठल गंगणे, भरत पाटील, प्रशांत कांबळे, विशाल वेसणे, विनायक काटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









