वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या महिन्यात सुरू होणाऱया भारतीय टेबल टेनिसपटूंच्या सराव प्रशिक्षण शिबिरात महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा सहभागी होणार नसल्याची माहिती अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सरचिटणीस एम.पी. सिंग यांनी दिली.
भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी हे प्रशिक्षण सराव शिबीर बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये सुरू होणार आहे. मात्र मनिका बात्रा या शिबिरात दाखल होणार नसून ती पुण्यामध्ये सराव करणार असल्याचे सांगण्यात आले. बेंगळूरमध्ये होणाऱया या शिबिरात आठपैकी केवळ तीन महिला टेबल टेनिसपटूंनी आपण सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.









