आधी पुरवठा सुरळीत करा मगच नवीन जोडण्या द्या
प्रतिनिधी/ म्हापसा
शहरातील काही भागात योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्याठिकाणी बिल्डरला नवीन जलवाहिनीसाठी जोडणी देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सायंकाळी मुख्याधिकाऱयांकडे निवेदन्द्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे, सितेश मोरे उपस्थित होते.
नवनिर्वाचित पालिका मंडळाने शहरातील लोकांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहरात पाणी व विजेची समस्या अनेक वर्षापासून आहे. सध्या नवीन परालिका मंडळ सत्तारूढ झाले आहे. पालिकेच्या पहिल्या बैठकीत शहरवासियांच्या हितार्थ असलेलेच ठराव मंजूर करावेत आणि त्यानंतरच बिल्डरांना नवीन वीज किंवा जलवाहिनीची जोडणी देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
म्हापशातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. घरपट्टी व इतर कर वेळेत भरूनही पालिकेतर्फे लोकांना योग्य रस्ते मिळाले नाही. याशिवाय नगरसेवकांनी पथदीव्यांची दखल घ्यावी. सकाळ्च्यावेळी पथदीवे सुरूच असतात तर रात्री बंद असतात याकडे राष्ट्रवादीने लक्ष वेधले आहे. शहरातील नाल्यांची व गटाराची दुरावस्था झाली आहे. ही गटारे वेळोवेळी साफ केली पाहिजे. जेणेकरून पावसाळय़ात ती तुंबणार नाही. यातील काही नाला हे थेट सेप्टिक टँकशी जोडले आहेत त्यामुळे तार नदी प्रदूषित झाली आहे. संबंधित उल्लंघनकर्त्यांवर कारवाई करावी. प्रत्येक नगरसेवकांने याची दखल घ्यावी. पालिकेने आरोग्य अधिकाऱयांच्या सहाय्याने जनजागृती करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करावे व गटार किंवा नाल्यांमध्ये सांडपाणी सोडू नये असे आवाहन करणअयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
पूर्वी जी बालउद्याने बांधली दगेलीत त्यांची योग्य काळजी घेतलेली नाही. पालिकेने यांची देखभाल करावी कारण यावर खूप पैसा खर्च करण्यात आला आहे असेही निवेदनात म्हटले आहे. पालिका मंडळात जे ठराव घेतले जातील त्यासंदर्भात लोकांना माहिती द्यावी. जेणेकरून लोक आपल्या सूचना करू शकतील. या ठरावाची प्रत लोकांसाठी उपलब्ध करून द्यावी असेही राष्ट्रवादी काँग्रेसटे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी या निवेदनात म्हटले आहे.









