जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार
सावंतवाडी/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून विलवडे येथील ३० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत विलवडे गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. पुर परिस्थितीमुळे या गावातील लोकांच नुकसान झाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ही मदत पोहोचवली. यावेळी आशिष कदम, हिदायतुल्ला खान, शैलेश लाड, असलम खान, राजू धारपवार, सोनू दळवी, यशवंत आमुणेकर, विनायक सावंत, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.









