मेष
वक्री मंगळामुळे क्षुल्लक कारणावरून डोके तापत राहील. खर्च वाढतील. कामाच्या मानाने यश मिळेलच असे नाही, पण या योगावर आपले कोण व परके कोण हे मात्र बरोबर समजेल. गुरु अनुकूल आहे, तोपर्यंत मंगलकार्य संदर्भातील कोणतीही कामे आटोपून घ्या. शुक्राचे भ्रमण नको त्या मार्गाकडे मन वळविल. अष्टमस्थ केतूमुळे काही प्रमाणात अंधश्रद्धेकडे मन झुकेल, पण त्यात फसवणूक व मानहानी होईल. रविला बळ नसल्याने महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.
वृषभ
रविचे भ्रमण कार्यपद्धतीत बदल घडवेल. काहीजणांना घराण्याच्या अहंकाराची बाधा होईल, पण त्यामुळे लोकांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत सप्ताह मध्यम आहे. आरोग्य सांभाळावे लागेल. अष्टमस्थ गुरुमुळे काहीतरी मोठे धनलाभ अथवा इस्टेट वगैरे मिळण्याचे संकेत दिसतात. केतुचे भ्रमण वैवाहिक बाबतीत चांगले नाही. मतभेद वाढवू नका, तसेच कुटुंबातील संकटांची कुठेही चर्चा करू नका. राहूच्या प्रभावामुळे मनात सतत काही ना काही धाकधूक राहील. मोठे आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले. राशीस्वामी बलहीन असल्याने कामाचा उरक वाढवावा लागेल.
मिथुन
गुरु अनुकूल आहे तोपर्यंत विवाह, भागिदारी, प्रवास, कोर्टमॅटर व समझोता याबाबतीत कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. पंचमातील रविमुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. चैनीप्रवृत्ती वाढेल. या काळात कुलदेवतेची पूजा अथवा घराण्यातील परंपरेनुसार धार्मिककार्य केल्यास उत्तम यश मिळेल. नातेवाईक मंडळी काहीतरी स्वार्थ ठेवून बोलणी करतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक वागा. या आठवडय़ात खर्च वाढतील. कोण काय म्हणतील याकडे लक्ष न देता व्यवहारीक वागा तरच निभाव लागेल.
कर्क
रविचे भ्रमण वास्तुच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडवील. शुक्रामुळे या कालावधीत तुमच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडतील. तीक्ष्ण व धारदार वस्तू जपून हाताळा. उधार, उसनवार यापासून दूर राहिलात तर पुढे त्याचा फायदा होईल. दशमस्थ शुक्रामुळे कामाचा ताण कमी होईल, पण दुसरीच जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर बाबीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. वाहन जपून चालवा.
सिंह
चंद्र-गुरु त्रिकोण योगामुळे कुटुंबात शुभकार्य घडतील. मुलाबाळांच्या बाबतीत भाग्योदय. तसेच बेकारांना नोकरी मिळण्याची शक्मयता. डोळय़ांना ताण पडेल, अशी कामे करू नका. रवि-हर्षलचा प्रतियोग तुमच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देईल. त्यामुळे उत्साह वाढेल. शिक्षणात उत्तम यश. मशिनरीचा संबंध असल्यास मात्र जरा काळजी घेणे आवश्यक आहे. केतुचे भ्रमण कौटुंबिक बाबतीत जरा त्रासदायक आहे. क्षुल्लक कारणाने वातावरण तापेल. वाहन खरेदी करताना पूर्ण माहिती काढल्याशिवाय व्यवहार करू नका. एखाद्यावेळेस मोठी फसवणूक होऊ शकते. कायदेशीर बाबी जपून हाताळा. पैसा आला तरी कसा गेला ते कळणार नाही. त्यामुळे चैन, प्रति÷ा वगैरे बाबांकडे फारसे लक्ष न देता पैसा राखून ठेवा.
कन्या
चंद्र-शुक्र युति किरकोळ लाभासाठी नको ते कार्य करण्यास भाग पाडील. गुरुचे भ्रमण मान व प्रति÷ा वाढविल. शिक्षणाचे अखेरचे वर्षे असेल तर अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. रवि-हर्षलचा प्रतियोग अपघात व गंडांतर दर्शवितो. त्यासाठी सावध राहा. तुमची वेशभूषा व बोलणे-चालणे यावरून काहीजण चुकीचे अनुमान काढतील. कर्ज प्रकरण, कोर्टमॅटर मध्यस्ती, प्रवास, वाहन खरेदी-विक्री याबाबतीत अनुकूल काळ आहे. थोडीशी सावधानता बाळगल्यास फार मोठे यश पदरी पडेल. तुमच्याकडे जर काही कलाकौशल्य असेल तर त्याचा उपयोग करण्यास हा काळ योग्य आहे.
तूळ
राशीस्वामी शुक्र बलहीन आहे. त्यामुळे नको त्या गोष्टीसाठी मोठा खर्च कराल. गुरुचे भ्रमण प्रवास, खरेदी-विक्री, लिखाण, भाऊबंदकी मिटविणे, पत्रव्यवहार याबाबतीत उत्तम यश देईल. रवि-हर्षलच्या प्रतियोगात अचानक काही महत्त्वाच्या बऱया-वाईट घटना घडतील. त्यासाठी सावधानता बाळगा. वक्री मंगळ आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक आहे. किरकोळ अपघात होऊ शकतात, पण काही गुप्त शत्रूंच्या कारवाया मात्र उघड होतील. त्यामुळे पुढे कशी पावले उचलावीत याचा अंदाज येईल. परिस्थिती कशी आहे हे पाहून त्याप्रमाणे निर्णय घ्या, म्हणजे अडचणी उद्भवणार नाहीत.
वृश्चिक
शुक्रामुळे चैनी मित्र-मैत्रिणी भेटतील, पण आपली परिस्थिती पाहून खर्च करा. गुरुची कृपा आहे तोपर्यंत कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करून घ्या. नवीन नोकरी असेल तर त्यात जॉईन व्हा. जर कोठे पैसे अडकले असतील तर ते वसूल होतील. रवि-हर्षलचा प्रतियोग अचानक काही नको त्या घटना घडवील. त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. पंचमातील वक्री मंगळ महत्वाकांक्षा वाढविल. इतर गोष्टांrकडे मन वळण्याची शक्मयता आहे. क्रीडाक्षेत्रात असाल तर त्यात चांगले यश मिळेल, पण त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. पारखानदारी, मशिनरी व तत्सम क्षेत्राशी संबंध असेल तर दुर्घटनेपासून सांभाळा. किरकोळ चूक देखील गंभीर समस्या निर्माण करू शकते.
धनु
महिलावर्गाने नोकरी जपून राहणे आवश्यक आहे. हर्षल-रविचा प्रतियोग मित्र-मैत्रिणी आणि संतती याबाबतीत विचित्र अनुभव देईल. शनिमुळे जागेचे व्यवहार पूर्ण होतील. चतुर्थातील वक्री मंगळामुळे कौटुंबिक ताणतणाव वाढतील. तीक्ष्ण व धारदार वस्तू जपून हाताळा. उधार उसनवार यापासून दूर राहिलात तर पुढे त्याचा फायदा होईल. दशमस्थ शुक्रामुळे कामाचा ताण कमी होईल, पण दुसरीच जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर बाबीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे.
मकर
शनि-गुरु दोन्ही प्रभावी आहेत, त्यामुळे जे काम कराल त्याचा दूरगामी परिणाम होईल. वक्री मंगळाचे भ्रमण कार्यकर्तृत्वाला पोषक असले तरी इतर बाबतीत अनुकूल नाही. वादावादी, मतभेद, दंगली, गैरसमज इत्यादी बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात पूर्वी जर कोणाशी वाकडे असेल तर तर वाद मिटविण्याचा प्रयत्न करा. स्वतः वाहन चालवत असाल तर नशापाणी करू नका. अपघात हेण्याची शक्मयता आहे.
कुंभ
अडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे प्रयत्न करा, कारण पुढे तुम्हाला नवीन कामे मिळणार आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल. साडेसातीचा त्रास होणार नाही. दूरचे प्रवास जपून करा. नातेवाईक, शेजारी व आपले मित्र यांच्याशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रति÷ा अथवा मोठेपणासाठी कोणताही देखावा करू नका. पुढे त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. धनस्थानी वक्री मंगळ खर्च वाढविल. बोलण्यात परखडपणा निर्माण होईल. उजव्या डोळय़ाची काळजी घ्या.
मीन
वक्री मंगळ महत्त्वाच्या कामाच्या बाबतीत काहीतरी गडबड करील. निर्णय चुकीचे ठरू शकतात. रवि-हर्षल प्रतियोग आर्थिक नाटय़मय घटना घडविल. एखाद्या कामासाठी ठेवलेला पैसा दुसऱयाच कारणासाठी खर्च होईल. राशीस्वामी गुरु प्रभावी आहे. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. काहीजणांना मोठय़ा ऑर्डरी मिळतील. राजकारणात असाल तर महत्त्वाचे पद मिळेल. विशेष प्रयत्न न करता नोकरीत प्रमोशन मिळेल. कितीही कटू प्रसंग आले तरी कोणाचे मन दुखवू नका.





