- 20-8.-23 ते 26-.8-.23 अक्षरयात्रा
मेष
या आठवड्यामध्ये कामांना जरी उशीर झाला तरी ती कामे पूर्ण होणार आणि त्यातून आर्थिक प्राप्ती चांगली असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही त्याचबरोबर मानसिक समाधानसुद्धा प्राप्त होईल. पूर्वी जास्त संबंध नसलेली अशी एखादी व्यक्ती कामानिमित्त भेटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता वाटेल.
गुळ दान द्या
वृषभ
या आठवड्यात काहीसा विचित्र योगायोग घडलेला दिसेल ज्यामध्ये अत्यंत जवळच्या माणसांमुळेच गुंतागुंती वाढू शकतात. खर्चाच्या बाबतीमध्ये बेफिकीर राहणे पुढच्या काळाच्या दृष्टीने थोडे त्रासदायक ठरू शकते. एखाद्या मित्रांनी दिलेल्या शब्द मोडल्यामुळे केलेला प्लॅन बदलून दुसरा करावा लागेल.
आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध घाला
मिथुन
वैवाहिक जीवनामध्ये जर तणाव आणि काहीसा असमंजसपणा अनुभवाला येत असेल तर घरातील किंवा परिचयातील ज्येष्ठ स्त्रीच्या मध्यस्थीमुळे किंवा सल्ल्यामुळे नाते सुधारायला मदत होईल. विवाह उत्सुक लोकांना या काळात चांगली संधी मिळू शकते. या आठवड्यात मर्जी नसताना त्याग करावा लागू शकतो.
गोड खाऊन कामाला जावे
कर्क
गेले काही दिवस गोंधळाची स्थिती होती. आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना सामोरे जात होता, या आठवड्यामध्ये तुम्हाला यामध्ये फरक जाणवायला सुऊवात होईल. अपेक्षा नसताना एखाद्याकडून मदत प्राप्त होणे, नवीन काम मिळण्यासाठी हव्या त्या व्यक्तीची भेट होणे अशा घटना घडू शकतात.
डाव्या मनगटावर 63 नंबर लिहा
सिंह
या आठवड्यामध्ये तुमचे विचार आणि तुमचे आचरण शांत आणि समंजस असे असेल. हेवेदावे किंवा भांडणापासून तुम्ही दूर राहाल. त्याचबरोबर येणाऱ्या काळाबद्दल एक प्रकारचा आशावाद निर्माण होईल. कुटुंबातील व्यक्तींकरता किंवा घराकरता थोडा खर्च करावा लागू शकतो. नवीन वाहन घेणे टाळा.
5 वेलदोडे जवळ ठेवावेत
कन्या
या आठवड्यात काही प्रसंग असे येतील की जिथे तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जे येते किंवा तुम्हाला आतून जे वाटते त्यानुसार निर्णय घ्यावे लागतील, अशावेळी बुद्धीपेक्षा आतल्या आवाजाकडे जास्त लक्ष द्या, फायदा होईल. नात्यांमध्ये गैरसमज किंवा कटुता निर्माण होऊ शकते. गुंतवणुकीमधून चांगला परतावा मिळू शकतो.
पावसाचे पाणी स्वयंपाक घरात ठेवा
तूळ
प्रगती करता संघर्ष अत्यावश्यक असतो हे या आठवड्यामध्ये तुम्हाला कळून चुकेल. या संघर्षातून चांगल्या प्रतीचे यश प्राप्त होईल यात शंका नाही. कष्टाचे प्रमाण वाढवावे लागणार. मेहनत घ्यावी लागणार आणि ही अवस्था बऱ्याच दिवसांकरता टिकू शकते. आत्मविश्वासात वाढ होणार. या काळात तुमचे संवाद कौशल्य वाढेल.
पिंपळाच्या पानावर स्वस्तिक काढून जवळ ठेवा
वृश्चिक
जे काम तुम्ही करत आहात त्यातून सकारात्मक परिणाम मिळेल याची खात्री बाळगा. तब्येतीच्या कारणामुळे किंवा भावनिक गुंतागुंतीमुळे कामाकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागेल. भविष्यात घडणाऱ्या जबरदस्त बदलाकडे तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. दानधर्म आणि पुण्याकडे तुमचा कल असेल.
धार्मिक स्थळी बदाम दान द्या
धनु
तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या संकटांना किंवा येणाऱ्या अडचणींना साहसाने सामोरे जाता याची प्रचिती देणारा हा आठवडा असेल. तब्येतीच्या काही तक्रारी पूर्वी घडल्या असतील तर त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसेल. वैद्यकीय उपचारामध्ये बदल करू शकता. या काळात तुमच्या पॅशनकडे लक्ष द्या. स्वप्नपूर्तीचा काळ आहे.
गरजूंना अन्नदान करावे
मकर
या काळामध्ये तुम्हाला अधिकार प्राप्तीचे योग बनत आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वातली शक्तिशाली बाजू या आठवड्यामध्ये पुढे येईल. मित्र परिवाराच्या किंवा नातेवाईकांच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी समजू शकतात किंवा एखादी वाईट बातमी कळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे.
दूध दान द्यावे
कुंभ
टॅरो कार्डच्या हिशोबाने तुम्ही सध्याला नात्यांमध्ये गोडवा कधी येईल किंवा नाती कधी सुधारतील याचा विचार करत आहात किंवा प्रतीक्षा करत आहात. एखाद्या ज्येष्ठ स्त्रीचा प्रभाव तुमच्यावर असल्याने एक प्रकारची आत्मीयता तुमच्यातील कामाच्या ठिकाणी योग्य तो बॅलन्स निर्माण करण्यावर तुमचा भर असेल.
तुरटी जवळ ठेवावी.
मीन
या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही वेळेला त्यामध्ये स्वत:कडचे पैसे गुंतवून भविष्याच्यादृष्टीने फायद्याचा विचार करावा लागू शकतो. काही लोक जाणून-बुजून तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संघर्ष करावा लागू शकतो. कुटुंबीयांच्या मदतीने पार व्हाल.
चांदीचे नाणे जवळ ठेवा
सहज सोपा इच्छापूर्ती करणारा उपाय: हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे. एका तमालपत्रावरती तुमची इच्छा हिरव्या शाईने लिहून खाली सही करावी. एका भांड्यात भीमसेनी कापराच्या पाच वड्या पेटवून ते तमालपत्र अग्नीत घालावे. घालत असताना इच्छापूर्तीचाच विचार करावा. चांगला अनुभव येईल





