23.02. ते 2. 3. 2022
मेष
कामाच्या व्यापात खाण्यापिण्याकडे आणि तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. पैशांची येणी उशिरा होतील. कुटुंबात स्त्रीमुळे भांडणाची शक्यता. छोट्य़ा प्रवासाचे योग आहेत. प्रेमींना काळ अनुकूल आहे. नोकरवर्गाला आनंदाचे दिवस. वैवाहिक सुख उत्तम. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. उपायः मंगळवारी हनुमानाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवा.
वृषभ
धनप्राप्ती सुगमतेने होईल. कुटुंबात एक छोटेखानी समारंभ होईल. स्थावर मालमत्तेतून लाभ. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात मधुरता येईल. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढत आहेत. सावध रहा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन जपून चालवा. समाजात तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल. असे काही करू नका. उपाय ः ‘ॐ दूं दुर्गाय नमः’ चा जप करा.
मिथुन
अनेक छोटय़ा मोठय़ा कामात यश मिळेल. कुणाचीही तस्करी करणे अंगलट येऊ शकते. धनप्राप्तीकरता जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रवास एकटय़ाने न करता सोबत घ्या. जमिनीसंबंधी वाटाघाटी यशस्वी होतील. संततीसुख चांगले आहे. मनोरंजनावर खर्च कराल. वैवाहिक जीवनात समाधान असेल. उपायः शनिवारी सकाळी पिंपळाखाली तुपाचा दिवा लावा.
कर्क
धनलाभ आणि प्रवासाचे योग आहेत. पण तब्येतीची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. सरकारी कामात यश मिळेल. भावंडांची साथ मिळेल. स्थावर मालमत्तेविषयी असलेल्या विवादांमध्ये मध्यस्थी होऊ नका. गुंतवणूक करताना सावध रहा. प्रेमीजनांना उत्तम काळ आहे. भाग्य साथ देईल. उपायः शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक करा.
सिंह
कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. वाटाघाटी यशस्वी होतील. आर्थिक लाभ होतील. लेखनकार्यात यश मिळेल. प्रेमप्रकरणात यश. शेअर्समध्ये लाभ. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. गुप्त गोष्टींचा खुलासा होईल. वाहन जपून चालवा. मित्रांची भेट होईल. उपायः कामाला जाताना तुळशीचे पान जवळ ठेवा.
कन्या
तब्येतीची उत्तम साथ राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. धनप्राप्ती उत्तम राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. छोटय़ा प्रवासातून लाभ होईल. शत्रू नामोहरम होतील. जीवनसाथीचा सहयोग मिळेल. मानसन्मानाचे योग. खर्चावर नियंत्रण ठेवा. उपायः देवाजवळ दिवा लावताना दिव्याच्या तेलात 2 लवंगा घाला.
तुळ
बऱयाच दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहात होता त्यासंबंधी सूचना मिळेल. आरोग्य चांगले राहील. मिळकतीत वाढ होईल. जमिनीसंबंधी व्यवहार सध्या टाळा. प्रेमप्रकरणात सावध रहा. शेअर्समध्ये गुंतवणूक टाळा. नोकरदारांना फायदा आहे. वैवाहिक जीवनात मतभेद. उपायः देवीला कुंकुमार्चन करा.
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. पैशांची आवक वाढेल. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन कराल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. जमिनीचे व्यवहार टाळा. गुंतवणूक करण्यासाठी काळ योग्य आहे. वैवाहिक जोडीदारासोबत वाद संभवतात. उपायः गाईच्या पायाखालची माती जवळ ठेवा.
धनु
बोलताना सावध रहावे लागेल. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत प्रवास टाळा. कागदोपत्री व्यवहारात सतर्क रहा. घराविषयी अडलेले काम पूर्ण होईल. प्रेमीजनांनी सावध रहावे. गुंतवणूक टाळा. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. भाग्य साथ देईल. उपायः सफाई कर्मचाऱयांना सन्मानपूर्वक गुळाची मिठाई भेट द्या.
मकर
छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. तब्येतीला सांभाळावे लागेल. धनप्राप्तीकरता जास्त कष्ट करावे लागतील. कुटुंबात वाद संभवतो. नोकरदारांकरता काळ अनुकूल आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. वाहन जपून चालवा. वैवाहिक जोडीदाराशी वाद टाळा. उपायः …. व दागिने ठेवता तिथे पारद कवडी ठेवावी.
कुंभ
मानसिक ताण तणावाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे कुपथ्य टाळा. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबात लहानसा सोहळा साजरा कराल. शेजाऱयांकडून मनस्ताप शेअर्समध्ये फायदा. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल. उपायः मोहरीच्या तेलाचे काही थेंब कच्च्या जमिनीवर टाका.
मीन
तब्येतीची उत्तम साथ राहील. येणी वसूल न झाल्याने चिडचिड होईल. प्रवास टाळा. वाहनसुख मिळेल. प्रेमात मनस्तापाचे योग आहेत. नोकरदारांना काळ अनुकूल आहे. भाग्याची उत्तम साथ मिळेल. प्रति÷ा वाढेल. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल. उपायः रविवारी रात्री पांढरी मोहरी घरात सगळीकडे टाका.