6.2.2022 ते 12.2.22 पर्यंत
मेष
जरी आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे पडला आहात, तरी सध्या संयमाची गरज आहे. प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील हा विश्वास ठेवा. सध्या तुम्ही ज्या कन्फ्यूज्ड मनस्थितीत आहात त्यातून नक्की बाहेर पडाल. या आठवडय़ात करियरकडे जास्त लक्ष द्या. आर्थिक बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण आहे. लवमेट्सनी एकमेकावर विश्वास ठेवावा. चांदीचा वापर जास्तीत जास्त करा.
वृषभ
काही घरगुती आणि काही कामाच्या ठिकाणी असणाऱया समस्या सुटू लागल्यामुळे मन आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. तब्येत ठीक राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजन ढासळू शकते. मित्रांसोबत वेळ घालवाल. लवमेट्समध्ये लहान मोठी भांडणे होतील. विवाहितांना काळ चांगला आहे. पती, पत्नीला पांढरी फुले द्या.
मिथुन
व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. येणी वसूल होतील. द्विधा मनस्थितीतून बाहेर या. हा आठवडा अनेक पर्याय घेऊन आलेला आहे. त्यातील योग्य पर्याय निवडण्यात तुमचे कौशल्य पणाला लागेल. परिवारात बाहेरच्या व्यक्तीची दखल सहन करू नका. लवमेट्स एकमेकाला गिफ्ट देतील. वैवाहिक जोडीदाराच्या मतांचा आदर करा. वृद्ध व्यक्तीला जमेल ती मदत करा.
कर्क
समाजात मानसन्मान वाढेल. ज्ये÷ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे किंवा मदतीमुळे कामे होतील. तब्येतीला सांभाळावे लागेल. पूर्वी दुरावलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. परिवारातील व्यक्तींच्या गरजा भागवताना दमछाक होईल. आर्थिक बाबतीत सावध रहा. फसवणूक होऊ शकते. लवमेट्सनी मर्यादांचे भान ठेवावे. जखमी जनावरावर औषधोपचार करा.
टॅरो उपाय ः तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर जे काही थेंब पानांवर उरतात, ते आपल्या डोक्मयावर शिंपडावे. हजार गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते.
सिंह
गुप्तपणे तुमच्या विरोधात षड्यंत्र करणाऱयाचे बिंग फुटेल. रागावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या वागण्या बोलण्यामुळे परिवारात ताण असेल. ऍसिडिटी/पित्ताचा त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला आहे. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. लवमेट्सकरताही आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात ताणतणाव. लाल सुगंधी फूल जवळ ठेवावे.
कन्या
मंगलकार्यात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभल्याने मन आनंदी राहील. घर स्वच्छ ठेवण्यात आणि घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. या आठवडय़ात बराचसा वेळ प्लॅनिंगमध्ये जाईल. स्वतः गरजांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे हे ध्यानात घ्या. कामाच्या ठिकाणी रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. घरात मोरपीस ठेवावे.
तुळ
सभोवतालच्या माणसांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. या आठवडय़ात आत्मविश्वासात वाढ होईल. कामे नव्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जबाबदाऱया वाढणार आहेत. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. लवमेट्सना हा आठवडा वादांचा आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराला पिवळी वस्तू भेट द्या.
वृश्चिक
काहीसा चांगला आणि काहीसा वाईट असा मिश्र स्वरुपाचा आठवडा आहे. या आठवडय़ात चिडचिड वाढल्याने कुटुंबातील वातावरण गढूळ राहील. जी कामे केलेली आहेत त्याचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्रास होईल. नवीन परियोजनांकरता वेळ अनुकूल आहे. लवमेट्सनी अहंपणा सोडवा. केळीच्या झाडाजवळची माती जवळ ठेवावी.
धनु
कष्टाचे चीज होईल. अपेक्षित परिणाम आल्याने आनंदी असाल. हाताखालच्या माणसांमुळे मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. आर्थिक व्यवहारात यश आहे. कुटुंबातील व्यक्तीला आजारपण संभवते. कामाच्या ठिकाणी लोभाला बळी पडू नका. नव्या ठिकाणी भेट द्याल. लवमेट्सना सांभाळून रहावे लागेल. बेलाचे पान आणि हळकुंड जवळ ठेवावे.
मकर
आळस झटकून कामाला लागावे लागेल. संथपणा सोडून कामांना गती द्यावी लागेल. परिवारातल्या ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला ऐका फायदा होईल. आर्थिक आवक चांगली आहे. पण खर्चावर आळा घाला. सर्दी पडशासारखे सामान्य आजार संभवतात. या आठवडय़ात तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो. वैवाहिकांनी वाद ताणू नये. पिंपळाचे खाली पडलेले पान जवळ ठेवा.
कुंभ
तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठीही करा. दुसऱयाला सल्ला देताना ती व्यक्ती योग्य आहे की नाही याचाही विचार करा. या आठवडय़ात भलाई करून कटू अनुभव येण्याची शक्मयता आहे. वादाच्या ठिकाणी मौन राहिलेले बरे. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. तब्येत सांभाळा. डाळिंबाच्या छोटय़ा काडीला अष्टगंध लावून जवळ ठेवा.
मीन
‘अति सर्वत्र वर्जयेत’ असा संदेश देणारा आठवडा आहे. या आठवडय़ात खाण्या-पिण्यात, वागण्या बोलण्यात, कष्ट करण्यात आणि आराम करण्यातसुद्धा अति करणे टाळा. कामाच्या ठिकाणी वरि÷ प्रशंसा करतील. आर्थिक नियोजन सफल राहील. लवमेट्स आनंदी असतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. सही करताना काळे पेन वापरा.





