रवि. दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2021
मेष
स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. मान प्रति÷ा सांभाळा. या सप्ताहात मंगळ हर्षल युती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करू नका. वाद वाढवू नका. गिऱहाईक सांभाळून ठेवावे लागेल. मोहाला बळी पडू नका. नोकरी टिकवा. राजकीय-सामाजिक ठिकाणी तुम्हाला बदनाम करण्याचा, तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, सावध रहा. स्पर्धा कठीण आहे. घरात समस्या निर्माण होईल.
वृषभ
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. पूर्वजांच्या आठवणीसाठीच श्राद्ध पक्ष महिना ठेवला आहे. त्यांचे यथासांग विधी पूर्ण करून तुमच्या कार्यावर लक्ष द्या. महत्त्वाची कामे लवकर संपवा. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक ठिकाणी तुमचे महत्त्व वाढवता येईल. योजना पूर्ण करा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारातील कामे होतील. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.
मिथुन
या सप्ताहात सूर्य, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात संयम ठेवल्यास कामे होतील. जास्त लाभाच्या फंदात पडू नका. कायदा मोडू नका. प्रवासात सावध रहा. नोकरी, कामात चुका करू नका. राजकीय, सामाजिक ठिकाणी तुमचे महत्त्व कमी करण्याची योजना तयार केली जाईल. जवळच्या लोकांना दुखवू नका. आर्थिक व्यवहारात अडकू नका. घरात समस्या येईल. खर्च वाढेल. मैत्रीत गैरसमज होईल. व्यसनाच्या नादी लागू नका.
कर्क
या सप्ताहात बुध गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. कोणतीही समस्या रेंगाळत ठेवू नका. व्यवहार वेळीच पूर्ण करा. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. संसारात चांगली बातमी मिळेल. राजकीय, सामाजिक ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करा. संबंध चांगले मजबूत करा. स्पर्धा जिंकाल. कोर्टाच्या संबंधित कामात यश मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.
सिंह
या सप्ताहात सूर्य, बुध युती, सूर्य, मंगळ युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. भागिदाराबरोबर जुळवून घ्या. नम्रता ठेवा. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरीत कायद्यानुसार कामे करा. राजकीय, सामाजिक ठिकाणी तुम्हाला प्रति÷ा टिकवता येईल. परंतु योग्य सल्ला देणारी व्यक्ती दूर जाण्याची शक्मयता आहे. वृद्धांची काळजी घ्या. मैत्रीत व्यवहार करताना काळजी घ्या. खर्च वाढेल.
कन्या
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. रागावर ताबा ठेवल्यास फार मोठे यश मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वाढ होईल. मानसन्मान मिळेल. महत्त्वाची व किचकट कामे करून घ्या. धंद्यात फायदा वाढेल. नवे काम मिळेल. नोकरीत वर्चस्व राहिल. संसारात मुलांची प्रगती आनंद देईल. घर, जमिनीसंबंधी कामे करून घ्या. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. योग्य ते ठरवा.
तुळ
या सप्ताहात मंगळ, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. गोड बोलून धंद्यातील कामे करून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कोणताही धोका विसरू नका. वाहन जपून चालवा. नोकरी टिकवा. घरातील वृद्धांची चिंता वाटेल. राजकीय, सामाजिक ठिकाणी बोलताना काळजी घ्या. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका. स्पर्धा सोपी नाही. संयम सोडू नका. खाण्या पिण्याचे तंत्र सांभाळा. वस्तू नीट सांभाळा.
वृश्चिक
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यातील कठीण कामे करून घ्या. मागील थकबाकी वसूल करा. कर्जाचे काम होईल. नवा परिचय उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक ठिकाणी चुका सुधारून नव्याने काम करू शकाल. स्पर्धा जिंकाल. मान, प्रति÷ा वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
धनु
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. मनावर कसले तरी दडपण राहिल. वस्तू सांभाळा. खाण्याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्ती गैरसमज करून घेतील. धंद्यातील कामे होतील. तुमचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक ठिकाणी युक्तीचा वापर करा. मुद्दे हुशारीने मांडा. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. स्पर्धा जिंकाल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून धोका, फसगत होईल.
मकर
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, मंगळ युती होत आहे. धंद्यात पुढे जाल. चर्चा यशस्वी होईल. नोकरीत तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक ठिकाणी लोकांसाठी लढाल. लोकप्रियता मिळेल. प्रति÷ा वाढेल, कठीण कामे बुधवारपासून होतील. स्पर्धा जिंकाल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रयत्न करा. संसारात चांगली घटना घडेल. नवीन परिचय, उत्साहवर्धक फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ होईल.
कुंभ
या सप्ताहात बुध नेपच्यून षडाष्टक योग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात समस्या येईल. धंदा टिकवा. कायदा पाळा. दुखापत होईल. सावधपणे व्यवहार व कृती करा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. प्राणघातक हल्ल्यापासून सावध. संसारात समस्या येईल. व्यवहार जपून करा. मान प्रति÷sवर टीका होईल. वादग्रस्त वातावरण राहिल.
मीन
या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. अडचणीवर मात करावी लागेल. संयम ठेवल्यास धंद्यात सुधारणा होईल. नवे काम मिळेल. नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. जनहिताचे कार्य करा. स्वतःची जागा मजबूत करून ठेवा. कोणतीही कठीण समस्या मागे ठेवू नका. संसारातील तणाव कमी होईल. कला, क्रीडा साहित्यात नवीन संधी मिळेल.





