रविवार दि.23 मे ते शनिवार 29 मे 2021
मेष
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. परंतु कोणताही वाद जास्त वाढवू नका. नोकरीत वरि÷ांच्या बरोबर जमवून घेता येईल. संसारात खंबीरपणे निर्णय घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. तुमचे साथीदार सहाय्य करतील. तुमच्यावर एखादा आरोप टाकण्याचा प्रयत्न होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
वृषभ
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. धंद्यात खर्च करावा लागेल, पण फायदा होईल. नोकर माणसांची नीट काळजी घ्या. नोकरीत तुमच्यावर वरि÷ खूष होतील. घरातील समस्या सोडवाल. रेंगाळलेले खरेदी, विक्रीचे काम करण्याचा प्रयत्न करा. कायदा पाळून रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढेल. कला, क्रीडा साहित्यात अडचणीवर मात करावी लागेल.
मिथुन
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. डोळय़ांची काळजी घ्या. वादग्रस्त विधान नोकरीत करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात कायद्याचे योग्य प्रकारे पालन करा. अरेरावी नको. रागावर ताबा ठेवा. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात वरिष्ठाचा सल्ला घ्या. प्रतिष्ठाचा गैरवापर करू नका.
कर्क
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, शनि लाभयोग होत आहे. धंद्यात सावध रहा. हिशोब नीट तपासा, वाद वाढवू नका. संसारात तारेवरची कसरत करावी लागेल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. इतरांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात उतावळेपणाने कोणतेही काम करू नका. प्रतिष्ठा सांभाळता येईल. कुणाला दुखवू नका.
सिंह
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. नम्रतेने वागल्यास तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत प्रभाव पडेल. घरातील कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची, किचकट कामे रेंगाळत ठेवू नका. अभ्यासपूर्ण वक्तव्य करता येईल. सहकार्य मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात तुमचा नावलौकिक वाढेल. ओळखी होतील.
कन्या
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बुद्धिचातुर्याने तुम्ही नवीन कामे मिळवू शकाल. वसुली करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरातील तणाव कमी करता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करा. प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखीमुळे तुमच्या कामात तुम्हाला सहाय्य घेता येईल.
तुळ
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. समाधान ठेवा. कायदा मोडू नका. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. नमते धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात हल्लाबोल केला जाईल. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. विरोधक मैत्री करण्यास येतील. संसारातील कामे वाढली तरी उत्साह टिकवता येईल.
वृश्चिक
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. वादाचा प्रसंग कधीही निर्माण होईल. त्यामुळे सौम्य शब्दात तुमचे मत राजकीय, सामाजिक कार्यात व्यक्त करा. धंद्यात फसगत टाळा. तणाव होईल. पैसा अनाठायी अडकून पडू शकतो. नोकरीमध्ये वरि÷ तुमची बाजू घेतील. सहकारी नाराज होतील. संसारात कामे वाढतील. खाण्याचे तंत्र सांभाळा.
धनु
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात सावध राहा. नोकरीत रागावर ताबा ठेवा. कायदा सर्वच ठिकाणी पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. नम्रता ठेवा. प्रतिष्ठावर टिकास्त्र सोडले जाईल. घरातील वरिष्ठा व्यक्तीची चिंता वाटेल. स्पर्धेत मेहनत करावी लागेल.
मकर
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात नोकर माणसांच्याकडून मनस्ताप होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करा. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात कोणतेही काम मागे ठेवू नका. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. व्यसन करू नका. जवळच्या व्यक्तींना कमी समजू नका. खर्च वाढेल.
कुंभ
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या शेवटी चांगली घटना घडेल. घरातील वृद्ध व्यक्तीबद्दल गैरसमज होईल. वाद वाढवू नका. कायदा पाळा. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होईल. गैरसमज तुमच्याबद्दल करून दिला जाईल. स्पर्धा कठीण वाटेल. खर्च वाढेल.
मीन
या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र प्रवेश, चंद्र, शनि लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. कायदा पाळा. नवे काम मिळवणे सोपे नाही. प्रवासात घाई करू नका. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात दबाव राहील. अनेक कामांची गर्दी होईल. मन अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. स्पर्धेत टिकणे सोपे नाही. नवीन मित्र मिळतील.





