रविवार दि.11 ते शनिवार दि.17 एप्रिल 2021
मेष
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या कार्याला आरंभ करता येईल. तुमच्या कोणत्याही कामात तुम्ही अग्रणी रहाल. मेहनत घ्या. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात जम बसेल. शेतकरी वर्गाला चांगले सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. संसारात आनंदी व्हाल. स्पर्धेत, शिक्षणात पुढे जाल.
वृषभ
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. घाई, उतावळेपणा न करता तुम्ही कामे करा. धंद्यात अंदाज चुकेल. त्यामुळे मोह आवरा. नवीन ओळखीवर जास्त भरवसा ठेवू नका. नोकरीत काम वाढेल. कायदा पालन सर्वकामे करताना करा. राजकीय, सामाजिक कार्यात कोणतेही विधान करताना चूक करू नका. अनाठायी खर्च टाळा. डोळय़ांची काळजी घ्या.
मिथुन
या सप्ताहात तुमच्याच राशीत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. आत्मविश्वास वाढेल. धंद्यात नवे काम लवकर मिळवा. मागील येणे वसूल करा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील चिंताजनक प्रश्न मार्गी लावता येतील. मान-प्रति÷ा वाढेल. घरातील चिंता कमी होईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.
कर्क
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहे. शनिवारी रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. धंद्यात नवे काम मिळेल. ओळखी होतील. मागील येणे वसूल करा. नोकरीतील कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील, पण कामे करून घ्या. कला, क्रीडा, साहित्यात नवी संधी मिळेल. अभ्यासात मुलांनी आळस करू नये. पोटाची काळजी घ्या.
सिंह
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात नवे काम मिळण्यास सुरुवात होईल. भेट घ्या. चर्चा करा. गुढीपाडव्याला नव्या कार्याची सुरुवात करा. वसुली करा. नोकरीतील कठीण कामे करता येतील. राजकीय, सामाजिक कार्यातील जटील प्रश्नावर उपाय शोधता येईल. प्रसिद्धी मिळेल. आरोप दूर करू शकाल. संसारात आनंदाची बातमी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाल.
कन्या
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात गोड बोलून रहा. जास्त मोह ठेवू नका. पैशाची गुंतवणूक नीट करा. फसगत होईल. नोकरीत वाद वाढवू नका. कामात चूक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला मोठेपणा देऊन, शत्रूवर हल्लाबोल करण्याचे काम सांगितले जाईल. तटस्थ रहा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रति÷ा सांभाळा. शिक्षणात लक्ष द्या. व्यसन नको.
तुळ
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रगती होईल. मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. ओळखीतून फायदेशीर कामे करून घेता येतील. घर, जमीन, खरेदी, विक्री करता येईल. नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. योजना पूर्ण करा. मान-प्रति÷ा मिळेल. स्पर्धेत चमकाल. परीक्षेत यश मिळेल. संसारातील कमी भरून काढता येईल.
वृश्चिक
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. व्यवहारात सावध रहा. धंद्यात फायदा वाढेल. पण तणाव होईल. गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीत नम्रपणे वागा. रागाचा पारा वाढवणारी घटना घडेल. संसारात तणाव करू नका. डोके शांत ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात धोका होईल. जनहिताचा विचार करा. स्पर्धा कठीण आहे.
धनु
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. धंद्यात फायदा होणारे काम मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. जनतेचा प्रतिसाद मिळेल.कामे रेंगाळत ठेवू नका. गुढीपाडव्याला चांगली बातमी मिळेल. स्पर्धा जिंकाल. नोकरीत प्रगती होईल. संसारातील वाद मिटवता येईल.
मकर
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. साडेसातीचे पर्व सुरू आहे. धंद्यात वाढ होईल. गिऱहाईकांबरोबर नम्रपणे बोला. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. संसारात मुलांच्या बरोबर मतभेद होतील. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात वाढ करता येईल. लोकांच्या भावना ओळखून त्यांना मदत करा. अतिरेक करू नका. कोर्टासंबंधी कामे करा.
कुंभ
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. खंबीरपणे मोठी जबाबदारी पूर्ण करून दाखवाल. धंद्यातील समस्या कमी होईल. नवे काम मिळेल. शेतीमधील कामे यशस्वीपणे करा. वसुली करा. नवीन ओळख उपयुक्त ठरेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यातील चूक सुधारून पुढे जाता येईल. जनसंपर्क वाढवा. घरात आनंदी रहाल.
मीन
या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत रवि, बुध प्रवेश करीत आहेत. धंद्यात नवे काम मिळेल. रागावर ताबा ठेवा. नवीन ओळखीतून फायदा होईल. अविवाहितांना स्थळे येतील. नोकरीत अरेरावी न करता कामे करा. प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात योग्य विचाराने निर्णय घ्या. स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.





