रविवार दि.8 ते शनिवार दि.14 नोव्हेंबर 2020
मेष
या सप्ताहात शुक्र-मंगळ प्रतियुती, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गोड बोलून धंदा करा. फायदा वाढेल. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठ खूष होतील. दीपावली आनंदात साजरी कराल. बुधवार, गुरुवार प्रवासात सावध रहा. घरात क्षुल्लक तणाव होईल. नरकचतुर्दशी, लक्ष्मी, कुबेर पूजन आत्मविश्वासाने साजरे कराल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना प्रसिद्धी मिळेल. चर्चा यशस्वी होईल. महत्त्वाची कामे करा.
वृषभ
या सप्ताहात चंद्र-शुक्र लाभयोग, शुक्र-मंगळ प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. अरेरावी करू नका. फायदा होईल. नोकरीत कामाचा क्याप वाढेल. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी या दिवशी सहनशीलता ठेवा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात ऐकीव बातमीवर जास्त विश्वास ठेवून वक्तव्य करणे धोक्मयाचे ठरेल. प्रति÷ा जपा. कलाक्षेत्रात ओळखी होतील.
मिथुन
या सप्ताहात चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात नवे कंत्राट मिळवा. शेअर्समध्ये फायदा होईल. वसुली करा. दीपावली आनंदात साजरी कराल. महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत कठीण काम मार्गी लावा. राजकीय- सामाजिक कार्यात डावपेच यशस्वी ठरतील, चर्चा, भेट घेता येईल. कला, साहित्यात प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील.
कर्क
चंद्र, शुक्र लाभयोग, शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीकुबेर पूजन आनंदात साजरे करा. या दिवाळीला प्रत्येक जणच संकटात सापडला आहे. काहींनी जवळच्या माणसांचा विरह सहन केला आहे. तरी जगायचं आहेच. म्हणून उत्साह व जिद्द ठेवा. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. शेतकरी वर्गाला डिसेंबरपासून चांगले दिवस येतील. नोकरी टिकवून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या.
सिंह
सूर्य-चंद्र लाभयोग, गुरु, प्लुटो युती होत आहे. रविवारी प्रवासात सावध रहा. आहे त्या परिस्थितीत माणसाला रहावे लागते. कोविड संकटाने सर्वांना घेरले आहे. दिवाळी उत्साहात साजरी करून घ्या. धंद्यात वाढ झाल्याने आत्मविश्वास वाढेल. जुने येणे वसुली करा. शेतकरी संकटात असताना खरं तर कोणताही सण साजरा होऊ शकत नाही. हिंमत ठेवा. मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ शकाल.
कन्या
चंद्र, बुध लाभयोग, शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. काहींना घरातील व्यक्तीचा विरह सहन करावा लागला असेल. परंतु लक्ष्मी- कुबेर पूजनाला नवे कार्य आरंभ करता येईल. यावषी पेक्षा पुढील दिवाळी चांगली ठरेल. धंद्यात फायदा होईल. बुधवार, गुरुवार वाहन हळू चालवा. रागावर ताबा ठेवा. शेतकरी वर्गाला पुढे दिलासा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल. नोकरी टिकवता येईल. ओळखी होतील.
तुळ
सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग, गुरु, प्लुटो युती होत आहे. धनत्रयोदशीला रागावर ताबा ठेवा. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन, मन प्रसन्न ठेवता येईल. सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की, कोविड संकट जाऊन प्रत्येकालाच लक्ष्मीचा वरदहस्त लाभो. धंद्यात गोड बोलून व्यवहार करा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. लोकांना नाराज करू नका. कायद्याचे पालन सर्व ठिकाणी करा. कठीण कामे करून घ्या.
वृश्चिक
चंद्र, शुक्र लाभयोग, शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. धंद्यात नोकरवर्गाला कठोर वाक्मयात बोलू नका. नवे काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. वसुलीचा प्रयत्न करा. दिवाळीच्या शुभेच्छा. मनाची द्विधा अवस्था होईल. लक्ष्मी-कुबेर पूजन चांगलाच विचार करून करा. चिडचिड करू नका. डिसेंबरपासून शेतकरीवर्गाला नवी दिशा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. नोकरी टिकवा.
धनु
चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. खंबीर रहा. हिंदू संस्कृतीत सण म्हणजे फक्त मौजमजा नसते. निसर्ग, प्राणी, देवता, मानव यांच्या योग्य संयोग करून बनवलेली संस्कृती आहे. त्यामुळे पूजन करा. प्रगतीची संधी पुढे येईलच. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. दौऱयात यश मिळेल. लोकांच्या गरजा पुरवा. कार्य करा. नोकरीत वरि÷ खूष होतील. दिवाळी संपन्न करा. दु:खानंतर सुख येतेच.
मकर
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. कठीण परिस्थितीचा सामना करून सर्वांना समाधान मानून सण साजरा करावयाचा आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे करा. निसर्गाला ईश्वराला प्रार्थना करूया. सहाय्य करा. शेतकऱयांचे हाल म्हणजे जनतेचे हाल आहेत. पुढील वर्ष तुम्हाला चांगले ठरेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. जनहित साधता येईल.
कुंभ
या आठवडय़ात चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. बुधवार, गुरुवार प्रवासात सावध रहा. दीपावली शुभशकून म्हणून साजरी करा. नवा आत्मविश्वास, उत्साह देणारे आपले सण आहेत. धंद्यात खर्च वाढेल. गिऱहाईकाबरोबर गोड बोला. तुमची फसगत होऊ शकते. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. लोकांना दुखवू नका. मदतीचा हात द्या. साहित्यात वाढ होईल. व्यसन नको. डोळय़ांची काळजी घ्या.
मीन
शुक्र, मंगळ प्रतियुती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. अतिशयोक्तीपूर्ण वागणे टाळा. संयम ठेवा. चिडचिडेपणाने सणाला वादाचे स्वरुप येईल. धंदा मिळेल. कठोर बोलणे नोकरवर्गाशी करू नका. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी प्रवासात सावध रहा. कोणतेही काम घाईत करू नका. नम्रता राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठेवा. आहे त्या स्थितीत सणाचा आनंद घ्या. इतरांना आनंद द्या. नोकरी टिकवा.





