रवि. 2 ते 8 ऑगस्ट 2020
मेष
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, मंगळ, गुरु केंद्रयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. खर्च करावा लागेल. रागाच्या भरात बोलू नका. नोकरीत क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. संयमाने प्रश्न सोडवा. अरेरावीची भाषा केल्यास प्रति÷sवर टीका होईल. संसारात जबाबदारी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. कायदा पाळा. कला, साहित्यात महत्त्वाचे काम कराल.
वृषभ
चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल काम मिळेल. या सप्ताहात किरकोळ मतभेद वाढतील. वाद वाढवू नका. कायदा प्रत्येक कामात पाळा. नोकरीत तुमचे महत्त्व वरि÷ांना पटेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती देता येईल. जनहितांचे कार्य करून लोकप्रियता मिळेल. इतरांना केलेल्या मदतीनेच तुम्हाला नशीब साथ देईल. संकट निवारण होईल.
मिथुन
चंद्र, मंगळ लाभयोग, मंगळ, गुरु केंद्रयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. जुना वाद मिटवता येईल. मोठे कंत्राट मिळेल. बुद्धिचातुर्य वापरा. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात अधिक चांगले निर्णय घेता येतील. तुमचे स्थान मजबूत करून ठेवा. लोकांना सढळ हाताने मदत करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. संसारातील वाद, तणाव कमी होईल. उत्साह वाढेल.
कर्क
चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र,मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवण्याची चर्चा यशस्वी होईल. खर्च अनाठायी होणार नाही. याकडे लक्ष द्या. गिऱहाईकाबरोबर प्रेमाने वागा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मागील चुका सुधारता येतील. गैरसमज दूर करू शकाल. संसारात तणाव होईल. खाण्या पिण्याची काळजी घ्या.
सिंह
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाकडय़ा वळणाने जाऊ नका. अपशब्द वापरू नका. मारामारीचा प्रसंग टाळाच. दुखापत होईल. नोकरीत काम वाढेल. सहनशीलता ठेवा. संसारात घरातील माणसे मदत करतील. वृद्धांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अहंकाराचे वर्तन नको. प्रति÷ा सांभाळा. कायदा पाळा. आक्रमकता नको.
कन्या
चंद, बुध प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये तात्पुरत्या स्वरुपाची गुंतवणूक करून फायदा करून घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. किचकट काम करून घ्या. लोकसंग्रह वाढवा. इतरांना मदत करण्यानेच तुमचे महत्त्व वाढेल. मुले, जीवनसाथी तुम्हाला खूष ठेवतील.
तुळ
चंद्र बुध प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसवता येईल. रागावर ताबा ठेवा. मागील येणे वसूल करा. नोकरीतील गैरसमज दूर करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला गती द्या. जनहिताची योजना राबवा. मदत करा. पुढील काळात त्याचाच उपयोग होईल. प्रकृती सुधारेल. कला, साहित्यात नवे कराल.
वृश्चिक
चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंदा वाढेल. जवळचे लोक अडचणी निर्माण करतील. प्रमाणाबाहेर विश्वास कुणावरही ठेवू नका. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. पण गुप्तशत्रू कारवाया करतील. तुमचा विश्वासघात होईल. भावनेच्या भरात व्यवहार करू नका.
धनु
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. कठोर शब्द वापरू नका. नोकरांना सांभाळा. नोकरी टिकवा. कामात चूक होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. कटकारस्थाने होतील. सहनशीलता ठेवा. प्रवासात सावध रहा. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. खंबीर रहा. पण आक्रमक नको.
मकर
चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंदा मिळवाल. काम पूर्ण कराल. पैसा अडकण्याची शक्मयता आहे. मोहाला बळी पडू नका. खाण्याची काळजी घ्या. क्यसन नको. नोकरी टिकवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करू शकाल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. नियमांचे पालन सर्व ठिकाणी नीट का. घरातील व्यक्तीची काळजी वाटेल.
कुंभ
बुध, शनि प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. नवे काम धंद्यात मिळवण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागतील. तडजोड करावी लागेल. खर्च वाढेल. नोकरीत कायद्याला धरून असलेले काम नीट करा. चूक टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप होईल. तुम्ही मोजकेच बोला. स्पष्ट बोलणे प्रसंगानुरुप ठेवा. कायद्याच्या कचाटय़ात कुठेही अडकू नका. संसारात धावपळ होईल.
मीन
चंद्र गुरु लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा सफल होईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत महत्त्व वाढेल. इतरांना मदत करावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. नम्र रहा. वाहन जपून चालवा. संसारात खर्च वाढेल. यांत्रिक बिघाड होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांना मदत करा. दुखवू नका. स्पष्ट बोलणे प्रसंग पाहून करा.





