रवि. 19 ते 25 जुलै 2020
मेष
या सप्ताहात बुध, हर्षल लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. कोणताही कायदा मोडू नका. वाद वाढवू नका. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्याला खिळ बसण्याची शक्मयता आहे. तुमचा राग कसा वाढवायचा, याचा विरोधक विचार करतील. टीका होईल. लोकप्रियता राहील. तुमची प्रगती रोखणे सोपे नाही. नोकरीत निर्णय घेताना घाई नको.
वृषभ
या सप्ताहात चंद्र, मंगळ त्रिकोण योग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवा. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत तुमच्याकडे कठीण काम दिले जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तुमचे महत्त्व टिकवता येईल. योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. लोकांच्या हितासाठी मेहनत घ्या. घरातील समस्या कमी होईल. पोटाची काळजी घ्या. कला, साहित्यात विचारांना चालना मिळेल. ओळखी वाढतील.
मिथुन
या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. प्रत्येक काम करतांना कायदा पाळा. किरकोळ वाद वाढवू नका. संसारातील नाराजीकडे लक्ष द्या. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. फसगत होईल. राजकीय, सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. मेहनत घ्या. चुका सुधारा, जम बसवा. साहित्यात प्रगती कराल.
कर्क
या सप्ताहात चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोलून काम करा. फायदा होईल. कठोर बोलणे टाळा. कामगारांची बाजू ऐकावी लागेल. नोकरीतील समस्या कमी करता येईल. संयमाने तुमचे मत व्यक्त करा. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी करून योजनांना पुढे नेता येईल. प्रति÷ा मिळेल. घरातील चिंता कमी होऊ शकेल. रविवार, सोमवार दडपण येईल.
सिंह
या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. वसुली करा. कुठेही मोठेपणाची भाषा वापरू नका. संयम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. नोकरीत कठीण काम करण्यात चूक होऊ शकते. लक्ष द्या. वाद वाढवू नका. राजकीय सामाजिक कार्याला मेहनत, संयम याची जोड द्या. अहंकार नको. अभ्यास पूर्ण निर्णय घ्या. सल्ला घ्या. कमीपणा वाटून घेऊन नका. मुले मदत करतील, प्रगती करतील.
कन्या
या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवता येईल. कोणताही कायदा मोडू नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीत महत्त्व वाढेल. कठीण काम पूर्ण करा. राजकीय, सामाजिक कार्यात विचारपूर्वक योजनांना गती द्या. परिस्थितीचा अभ्यास करा. अनुभव उपयोगी पडेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कला, साहित्यात आनंद मिळेल.
तुळ
या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. वसुली करणे कठीण होईल. कोणत्याही व्यक्तीबरोबर कोणताही वाद वाढवू नका. संयम ठेवा. यश मिळवा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण द्या. मेहनत घ्या. संधी कमी वेळासाठी असते. चांगले कार्य करा. स्थान मजबूत करा. कुणालाही कमी लेखू नका. खाण्याची पिण्याची काळजी घ्या.
वृश्चिक
या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र,शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी मेहनत घ्या. इतरांच्या बोलण्यावर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवू नका. जसे बोलतात तसेच वागतात, अशी माणसे कमी असतात. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कायांतील उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करा. अहंकार न ठेवता वागा. घरात शुभ समाचार मिळेल.
धनु
या सप्ताहात सूर्य, शनि प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात मतभेद होतील. त्यात सुधारणा करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. भागिदाराशी गोड बोला. प्रेमात तणाव, फसगत होईल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्याबद्दल गैरसमज होईल. राग वाढेल. घरातील व्यक्तीची चिंता कराल. दुरावा संभवतो.
मकर
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात अडचणीवर मात करावी लागेल. चर्चेत वाद वाढवू नका. कठोर शब्द वापरू नका. प्रत्येक ठिकाणी कायदा पाळा. वसुलीचा प्रयत्न करा. अहंकार नको. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. कोणताही निर्णय दूर दृष्टिकोनातून घ्या. संयम सोडू नका. लोकांना मदत करा. घरातील तणाव कमी होईल. कलेत प्रगती कराल.
कुंभ
या सप्ताहात बुध, हर्षल लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळाले, तरी त्यात अडथळे येतील. खर्च वाढेल. विचाराने वागा. यश मिळेल. कायदा पाळा. दादागिरी नको. नोकरीत कामाचा दबाव वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. नातलगांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. आरोप होईल. कोणताही व्यवहार सावधपणे करा.
मीन
या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. फायदा मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. नोकरीत तुमच्या कामाची कदर वरि÷ करतील. राजकीय, सामाजिक कार्याला वेग देता येईल. जनहिताचे कार्य करत रहा. लोकप्रियता मिळेल. पदाधिकार मिळेल. संसारात शुभसमाचार मिळेल. कला, साहित्यात तुम्हाला प्रगती करता येईल. परिचय वाढतील.





