भूतदया हा ईश्वरी कृपेचा राजमार्ग…
पहिला भाग
बुध. दि. 8 ते 14 जुलै 2020
आपल्या हिंदू धर्मात पंच महायज्ञ सांगितले आहेत. त्यातील भूतयज्ञ हा प्रकार कुणाला माहीत नसेल. कोणताही जीव 84 लक्ष योनीतून जात असतो. कोणकोणत्या रुपाने जन्माला आलेला आहे, ते कळत नसते. त्यातही वृक्ष आणि प्राणी यांना विशेष महत्त्व आहे. मुक्मया प्राण्यांना अन्नदान करणे, यालाच भूतदया असे म्हणतात. या भूतदयेने घराण्यातील अनेक शापित दोष नष्ट होतात. प्राणी बाळगलेच पाहिजेत, असे नाही. रस्त्यात दिसणारे असंख्य प्राणी तुमच्याकडे आशेने पहात असतात. कोण आपला अन्नदाता आहे, हे ते पहात असतात, व त्यांच्या रुपाने देवही आपली परीक्षा पहात असतो. आपण जे पैसे कमावते, त्याचा काही भाग तरी मुक्मया प्राण्यांसाठी खर्च व्हायला पाहिजे. तरच त्या पैशाला समृद्धी व सुखसमाधान लाभते. लोक मुक्मया प्राण्यांना पशुपक्षंाना खाऊ घालणे सोडाच, उलट त्यांना हिडीसफिडीस करतात. त्यांना दंडुक्मयाने अथवा लाथेने मारतात, विष घालतात तर काही जणांना जिवंतपणीच मृत्यू यातना देतात. पण परमेश्वराच्या दरबारात याची सूक्ष्मपणे नोंद होत असते व वेळ फिरली की, सर्व काही उलट व्हायला लागते. कर्ती सवरती तरुण मुले अचानक भयानक अपघातात जातात, चांगला पगार असलेली नोकरी सुटते, ठरत आलेले लग्न मोडते, अथवा मोठय़ा थाटामाटात डामडौलाने करून दिलेल्या लग्नाचा नंतर बोजवारा उडतो. मुलीला वैधव्य येते किंवा सवत येते, बढती मिळण्याच्याऐवजी नोकरीत बडतर्फ होण्याची वेळ येते, विमान अथवा किमती कारगाडीतून फिरत असताना कुठेतरी पाय मुरगळतो, अथवा अपघात होऊन अपंग होऊन पडावे लागते. अनेकजण वेगवेगळय़ा मार्गाने पैसा कमवत असतात. पैसा कुणीही कमावू शकतात, पण ज्या पैशाने शांतता, समाधान व समृद्धी येते, तीच खरी ‘लक्ष्मी’ समजतात. मानसिक समाधान, निरोगी जीवन, शांत झोप व कौटुंबिक सौख्य नसेल, सतत बदनामी, सतत जिवाची भीती अशी वेळ येत असेल तर प्रचंड संपत्ती असूनही त्याचा काय उपयोग? हे असे जे दोष असतात, त्यांचा स्वत:ला व कुटुंबियांना मुलाबाळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठीच मुक्मया प्राण्यांना अन्नदान करावे. वृक्षसंवर्धन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे. आपल्या कमाईचा थोडा तरी भाग पशू पक्ष्यांसाठी त्यांच्या पोटापाण्यासाठी खर्च केला पाहिजे, तरच मोठय़ा संकटाच्यावेळी देव कुणाच्या तरी रुपाने येऊन रक्षण करील व तुमच्या कमाईच्या पैशाला उर्जितावस्था येईल. एक नामांकीत व मोठे हॉस्पिटल…देश परदेशातून येणारे रुग्ण व त्याच्याकडून भरमसाठ रक्कम घेऊन उपचार करणाऱया नामांकित डॉक्टरच्या मुलाला अपघात होऊन त्याचा मृत्यू ओढवल्याचा व्हिडिओ अलीकडेच पहाण्यात आला. कोटय़वधी रुपये, नोकरचाकर, नामवंत डॉक्टरांचा फौजफाटा व मोठे सुसज्ज हॉस्पिटल असूनही त्या डॉक्टरना आपल्या मुलाचा जीव वाचविता आला नाही. कारण पैसा असला तरी पुण्याईचे कोणतेही कार्य नाही. त्यामुळे परेमश्वराचे सहकार्य कसे मिळणार? यासाठीच मुक्मया प्राण्यांना अन्नदान करावे. कोणत्या पशुपक्ष्यात कोणते गुणधर्म असतात व ते तुमचे रक्षण अथवा भाग्योदय कसे करतात, हे पुढील भागात दिलेले आहे.
मेष
बुध, राहू तृतीयात, धनस्थानी शुक्र, भाग्यात गुरु व दशमात शनि हा एक प्रकारचा राजयोग म्हणता येईल. तुमचे नियोजन चांगले असेल तर फार मोठे यश मिळवू शकाल. जागा, वाहन, घरदार, कर्जफेड या बाबतीत अनुकूल योग. मनात जे आणाल, ते साध्य करू शकाल. प्रवासात नव्या ओळखी होतील. तसेच घराण्यातील काही दोषही नातेवाईकांकडून समजतील. त्याचे निवारण करून घ्या. अडचणी कमी होतील.
वृषभ
रवि, राहू, बुध धनस्थानी, शुक्र स्वगृही, शनि भाग्यात व गुरु अष्टमात हा योग अनेक बाबतीत जीवनाला शुभ कलाटणी देणारा व सर्व कामात यश देणारा आहे. जीवनातील अत्यंत जटिल समस्या सुटतील. काही व्यवहारिक गणिते बरोबर जुळतील. पण लांबचे प्रवास, अपघात दर्शवितात. काळजी घ्यावी. आठवडय़ातील उत्तरार्धात मतभेद व मध्यस्थीचे प्रकार टाळावेत.
मिथुन
बाराव्या स्थानी स्वगृहीचा शुक्र धनलाभ घडवील. दशमातील मंगळ मोठय़ा कामात यश देईल. केतू सप्तमात आहे. सर्व तऱहेच्या अपघात व दुर्घटनेपासून जपावे. उधारी व्यवहारात धोका होऊ शकेल. पण स्वत:ची वास्तू, जागा, दुकान वगैरेसाठी प्रयत्न करीत असाल तर उत्तम यश मिळेल. बुध, राहू योगामुळे तुटलेले संबंध पुन्हा जुळतील.
कर्क
शुक्र लाभात धनलाभदर्शक आहे. गुरु षष्टात. आरोग्याच्या बाबतीत अनुकूल, पण गोड खाणे टाळा. केतुमुळे व्यावहारिक गोष्टीत गडबड होण्याची शक्मयता आहे. कोणतेही गैरसमज होणार नाहीत, यासाठी जपावे लागेल. शत्रुत्वाला वाव देणाऱया घटना घडतील. आर्थिक बाबतीत चांगले योग, पण खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक आजारापासून जपावे.
सिंह
लाभातील राहू, बुध योगामुळे सर्व क्षेत्रात तुमची प्रगती वेगाने चालू राहील. आर्थिक प्रगती चांगली राहील. गुरु अनुकूल असल्याने संततीविषयक सर्व इच्छा पूर्ण होतील. चंद्र, शनि षडाष्टकामुळे ऐनवेळी महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्मयता आहे. कोर्टमॅटर व इतर बाबतीत जरा दक्ष रहावे लागेल. कुणाचेही मन न दुखविता या आठवडय़ात महत्त्वाची कामे करून घ्या.
कन्या
गुरु व मंगळाच्या सहकार्यामुळे वास्तुसंदर्भातील सर्व कामे होतील. बुध व राहू योगामुळे आर्थिक बाजू सावरली जाईल, पण किरकोळ वादावादीमुळे घरातील वातावरण तप्त राहील. धनलाभाच्या अनेक संधी येतील. पण विलंब अथवा तत्सम कारणामुळे त्याचा फायदा होईलच असे नाही. घरगुती बाबतीत काही ठोस व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागेल.
तुळ
अष्टमात शुक्र कमी श्रमात मोठा धनलाभ, भाग्यातील बुध राहुमुळे अचानक प्रवास, तसेच स्वगृहीच्या शनिमुळे वास्तुविषयक कामात यश मिळेल. घराण्यात एखादी व्यक्ती हरवली किंवा परागंदा झालेली असेल, दत्तक घेतलेल्या मुलाकडून त्रास होत असेल, घरात सतत काही ना काही कटकटी सुरू असतील, तर त्या कमी होतील. नोकरी, उद्योग, व्यवसाय, विवाह या सर्व बाबतीत चांगले योग.
वृश्चिक
सप्तमात स्वगृहीचा शुक्र असल्याने विवाहासाठी जे स्थळ येईल ते भाग्यशाली असेल, सर्व कामात चांगले यश. कर्तबगारीला वाव देणारे ग्रहमान. महत्त्वाच्या गोष्टींना मूर्तस्वरुप प्राप्त करून द्याल. आर्थिक व्यवहारातून काही नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रेमप्रकरणाचे विवाहात रुपांतर होऊ शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच कुणाशी शत्रुत्व ओढवले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
धनु
आपल्या राशीतच गुरु असल्याने आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत. डोळय़ांचे विकार जाणवतील. कमाई व खर्च यात ताळमेळ योग्य ठेवा, म्हणजे पुढील योजनाना मूर्तस्वरुप देऊ शकाल. चुकीच्या बजेटमुळे महत्त्वाचे बेत बदलावे लागतील. गैरसमज शत्रुत्व व तत्सम प्रकारामुळे होणारी छळवणूक व भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. महत्त्वाच्या गोष्टी सोडून इतर बाबींकडे लक्ष वळण्याची शक्मयता आहे.
मकर
पंचमात स्वगृहीचा शुक्र अत्यंत शुभ फळे देईल. संततीच्या बाबतीत महत्त्वाच्या चांगल्या घटना. साडेसाती सुरू आहे. मंत्रतंत्र करणारे, मांत्रिक अथवा गंडेदोरे लिंबू तसेच अंगारे धुपारे करणारे अशा क्यक्तांपासून दूर रहा व स्वत:ही त्या मार्गात जाऊ नका. साध्यासुध्या गोष्टीवरून मस्तक भडकण्याचे प्रसंग येतील. वास्तू, जागा, घरदार व वाहन घेण्याच्या विचारात असाल तर चांगले योग.
कुंभ
चतुर्थात शुक्रामुळे कौटुंबिक जीवन चांगले व समाधानी राहील. वादवादी असेल तर तिला पूर्णविराम मिळेल. अचानक खर्च, नको त्या व्यक्तींचा संपर्क व बाधिक ठिकाणी जाण्याची वेळ येणे असे प्रकार घडतील. स्वस्तात जागा अथवा सोने वगैरे आकर्षक दिसेल. काळजी घ्यावी. सामाजिक कार्यात चांगले यश. वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यावर मार्ग निघेल. लग्न जुळत नसेल तर कुलदेवतेचे पूजन करा, यश मिळेल.
मीन
शनि लाभात, वाहन, जागा व आर्थिक बाबतीत चांगले योग. सुखी जीवन जगण्याचा नवा मार्ग दृष्टीस पडेल. शत्रूवर विजय मिळवाल. सर्व कामात मोठे यश देणारे योग. मनातील सर्व आशा-आकांक्षा पूर्ण होतील. पण वाहन वेग, मध्यस्थी व इतर बाबतीत जरा जपून रहावे लागेल. जितके मोठे यश तितके मोठे ताणतणाव राहतील.





