जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील रामपूर येथील आनंद महादेव शिवशरण (वय 42) या कामगाराचा दुचाकीवरून तोल जाऊन दगडावर पडल्याने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. हा अपघात रामपूर येथे शिवशरण यांच्या घराजवळ झाला. मयत आनंद शिवशरण हे जत एमआयडीसी येथे असणाऱ्या वारणा दूध संस्थेत कामाला आहेत. दुपारी ते कामावर जात असताना, त्यांची दुचाकी स्लीप झाली. ते गाडीवरून दगडावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. अति रक्तस्राव झाल्याने, त्यांना उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.








