प्रतिनिधी / बेळगाव
श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचे भव्य असे मंदिर बांधण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाची मदत व्हावी या उद्देशाने देशभर निधी संकलनाचे काम केले जात आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान राबविले जात असून, बेळगावमध्ये रविवारी घरोघरी जाऊन निधी संकलित करण्यात आला.
आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे या मंदिर निर्माणासाठी मदत केली जात आहे. प्रत्येक गावोगावी विभागांमध्ये जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने निधीचे संकलन केले जात आहे. शनिवारपासून बेळगाव शहर व परिसरात मोठय़ा प्रमाणात निधी संकलित केला जात आहे. रविवारी बेळगाव शहरात घरोघरी जाऊन निधीचे संकलन करण्यात आले.









