राधानगरी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन चार दिवसांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा तिसरा दरवाजा उघडला असून धरणाच्या ३, ५ आणि ६ व्या धरणातून ७ हजार ११२ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजाराम बंधारा येथे नदीची पाणीपातळी ३३.५ फूट इतकी आहे. पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सध्या जिल्ह्यातील इतर धरणांमधून पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे तुळशी- 328, वारणा -12984, दुधगंगा- 4800, कासारी- 1750, कडवी -1608, कुंभी – 350, पाटगाव -00, चिकोत्रा -00, चित्री -1568, जंगमहट्टि- 335, घटप्रभा -6331, जांभरे-1694 कोदे-703
(1)राजापूर बंधारा पाणी पातळी 35-00 फुट आहे (धोका पातळी 58-00इशारा पातळी 53-00) फुट
( 2) न्रुरसिंहवाडी सध्या 44-00 फुट आहे (धोका 68-00 फुट इशारा 65-00 फुट)
(3)शिरोळ सध्या 45-00 फुट आहे (धोका पातळी 78-00 इशारा 74-00आहे)
(4) इचलकरंजी सध्या 56 – 00 फुट आहे( धोका पातळी 71-00 इशारा 68-00)
(5) तेरवाड सध्या 52-6 आहे( धोका पातळी 73-00 इशारा 71-00)
(6) कोयना धरण सध्या 90-36 टि .एम्. सि .आहे आवक 59258 जावक वीसर्ग 35732 आहे)
(7)अलमट्टि सध्या 115-871टि.एम.सि. आहे आवक 127200 व जावक विसर्ग 82000 )
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









