राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील धामोड, राधानगरी व सोळांकूर या गावांमध्ये दिनांक २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरमध्ये विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्फत फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना घेऊन माननीय उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी तळागाळातील लोकांना न्याय सत्वर मिळावा वेळेची व पैशाची बचत व्हावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक ८ नोव्हेंबर पासून १८ डिसेंबर अखेर फिरत्या मोबाईल व्हॅन मधून महाराष्ट्रतील गावांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले आहे.
या अनुषंगाने राधानगरी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले खटले धामोड, राधानगरी व सोळांकूर या पंचक्रोशी मधील पक्षकारांना आपली खटले तडजोडीने मिटवायला संधी मिळणार आहे. तरी माननीय उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण या गावांच्या परिसरातील पक्षकारांना आव्हान करते कि, राधानगरी न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले खटले वरील नमूद तारखेला त्या – त्या गावांमध्ये जाऊन परस्पर मिटवावेत. असे आवाहन तालुका विधी सेवा समिती राधानगरी अध्यक्ष एस. के. शेख यांनी केले आहे. या फिरत्या लोकन्यायामध्ये राधानगरी बारचे विधिज्ञ सहभागी होणार आहेत. या लोकन्यायालयाचे नियोजन राधानगरी तालुक्यामध्ये विधी सेवा समिती, राधानगरी यांनी केले आहे.