शरद पवार व के. पी. पाटील यांच्या प्रतिमा फलकावर पुष्पवृष्टी
प्रतिनिधी/सरवडे
राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाल्याबद्दल बिद्री साखर कारखान्यावर शाहू साखर कामगार संघाच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करुन देशाचे नेते शरद पवार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांचे भव्य फलक उभारुन त्यावर पुष्पवृष्टी केली.
राज्यातील साखर कामगार गेल्या तीस महिन्यापासून पगारवाढीच्या प्रतिक्षेत होते. साखर संकुल पुणे येथे झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत आंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगारवाढीचा निर्णय घेवून 12 टक्के वेतन वाढीवर शिक्कामोर्तब झाले. पगारवाढीचा निर्णय त्वरीत व्हावा यासाठी राज्यातील साखर कामगार संघटना यांनी आंदोलने केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू साखर कामगार संघटनेने याबाबत लढा उभारुन पुणे साखर आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. विविध संघटनेच्या लढ्याला आल्यामुळे सर्वच साखर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बिद्री साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या आनंदोत्सव सभेत कामगार नेते आर. वाय. पाटील म्हणाले, पगारवाढीचा निर्णय समितीतील नेते शरद पवार, कामगार संघटनेचे नेते तात्यासाहेब काळे, बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांच्या सकारात्मक भुमिकेतून झाला आहे. समितीने घेतलेल्या निर्णयाची कारखान्यांनी अंमलबजावणी तात्काळ करावी.
यावेळी शाहू कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे यांचा दिनकर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामगार संचालक भिमराव किल्लेदार, शिवाजीराव केसरकर, यांची भाषणे झाली. यावेळी कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चिफ अकौंटट एस. ए. कुलकर्णी, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व्हि. डी. व्हरकट, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









