प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवार 27 एप्रिल रात्री नऊ वाजल्यापासून 14 दिवसांचा क्लोजडाऊन जाहीर केला आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना, मुख्यमंत्र्यांनी नजीकच्या काळात राज्यात कोणत्याच निवडणूका होणार नाहीत. यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करत असल्याचेही पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.