बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचे चक्र सुरूच आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे २९ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सोमवारी २९,७४४ कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. यासह राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २,८१,०४२ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार सोमवारी राज्यात १०,६६३ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत. सोमवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १४,६२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सोमवारी कोरोना सकारात्मकतेचा दर १७.८७ टक्के होता.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी १६,५४५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर ४,३१३ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. जिल्ह्यात २४ तासात ७७ लोक मरण पावले आहेत.









