बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोनाचे ३७८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ५३७ रुग्णांना कोरोनावर मत केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालं आहे. दरम्यान राज्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,४६,४५४ वर पोहोचली असून त्यापैकी ९,२८,४६१ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले आहे. तर कोरोनामुळे आता पर्यंत १२,२७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ५,६९८ सक्रिय रुग्ण आहेत.
कोप्पळ जिल्ह्यात लसीकरणानंतर एका ३५ वर्षीय आशा वर्करला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला असता तिला २० मिनिटानंतर श्वास आणि सतत खोकला आला. यांनतर तिला उपचारासाठी गंगावती सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे महत्त्वाचे घटक स्थिर आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.









