बुधवारी 7,345 नवे रुग्ण : दिवसभरात 17,913 जण संसर्गमुक्त : 148 बाधितांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात बुधवारी 1,15,560 सक्रिय रुग्ण होते. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये 7,345 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 17,913 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 148 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4.35 टक्क्यापर्यंत खाली आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार बुधवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 19 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर म्हैसूर जिल्हय़ात 28, मंगळूर जिल्हय़ात 10, बेळगाव जिल्हय़ात 14 रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 27,84,355 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकूण 25,99,472 जण बरे झाले आहेत. तर एकूण 33,296 जणांचा बळी गेला आहे.
राज्यात बुधवारी 1,68,712 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 4.35 टक्के इतका आहे. मंगळवारी देखील पॉझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांच्या खाली होता. आठवडाभरापासून नवे रुग्ण आढळण्याचा आलेख खाली येत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ात बुधवारी 1,611 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर बागलकोट जिल्हय़ात 47, बळ्ळारीत 183, बेळगाव 254, बेंगळूर ग्रामीण 275, बिदर 14, चामराजनगर 97, चिक्कबळ्ळापूर 145, चिक्कमंगळूर 254, चित्रदुर्ग 95, मंगळूर 790, दावणगेरे 207, धारवाड 112, गदग 52, हासन 531, हावेरी 27, गुलबर्गा 26, कोडगू 116, कोलार 102, कोप्पळ 77, मंडय़ा 317, म्हैसूर 841, रायचूर 22, रामनगर 58, शिमोगा 262, तुमकूर 347, उडुपी 159, कारवार 239, विजापूर 73, यादगीर जिल्हय़ात 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत.









