ऑनलाईन टीम
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांपैकी एक असणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा विळखा वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 30 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले असून चार पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता 5 हजार 205 वर गेली असून 1 हजार 70 बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 4 हजार 71 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, देशभरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशात २४ हजार ८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा कोरोना रुग्णांच्या वाढीतील आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.
Previous Article‘Elyments’ ॲपचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते लॉन्चिंग
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज १२ कोरोनाबाधित रुग्णांची भर









