पुणे / प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागांत शुक्रवारपासून वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तीन दिवस पावसाची तीव्रता राहणार आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, ते सध्या मध्य प्रदेश व लगतच्या भागात आहे. यामुळे मध्य प्रदेश व लगतच्या उत्तर प्रदेश मधील काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान गुरुवारी राज्यातील अनेक भागात तुरळक पाऊस राहील.
शुक्रवारपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस अनेक भागात राहणार आहे. रविवारपर्यंत अनेक भागात अशी स्थिती राहील. कोकणात सध्या कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.








