प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य ओलित क्षेत्र प्राधिकरणातर्फे ओलित क्षेत्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेत श्याम गांवकर यांना प्रथम क्रमांकाचे जाहीर झाले आहे. त्यांना रु. 5000 व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ओलित क्षेत्र आणि जैवविविधता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील दुसरे बक्षिस एँथनी केवीन परैरा तर तिसरे बक्षिस मारिया मिरांडा यांना प्राप्त झाले आहे.
याशिवाय दिव्यांगासाठी ओलित क्षेत्र आणि जैवविविधता या विषयावर पोस्टर स्पर्धेचे व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचाही निकाल जाहीर झाला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल गोवा राज्य ओलित क्षेत्र प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे कळविण्यात आले आहे.









