प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, कर्नाटक सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रोत्साहक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर देवस्थानमध्ये राज्यस्तरीय जनविज्ञान चळवळ कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डॉ. डी. एन. मिसाळे यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल आयोजक संस्थांच्यावतीने त्यांचा भक्य सत्कार करण्यात आला.
यावेळी धारवाड प्रादेशिक विज्ञान केंद्राचे संचालक इरण्णा भोविशेट्टी, कर्नाटक राज्य विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष एच. व्ही. हुद्दार व खजिनदार बसवराज आदी उपस्थित होते.









