प्रतिनिधी / सांगली
काँग्रेसचे युवा नेते आणि महाविकास आघाडीतील राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले डॉक्टर विश्वजीत कदम कृषी राज्यमंत्री व भंडारा जिल्हा पालकमंत्री आहेत. कोरोना संकट व महापूर काळात क्षणभर विश्रांती न घेता ते मदत व नियोजन कार्यात आघाडीवर होते. घरात काका व अन्य सदस्य पॉझिटिव्ह असताना ते भिलवडी, वांगी, सांगली, पुणे, सोलापूर भंडारा येथे कोरोना महामारी विरोधी लढा देत होते. काल त्यांना थोडा ताप आला ,तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची तब्येत बरी आहे. वैद्यकीय उपचार व काळजी घेण्यात आली आहे. संपर्कातील मंडळीना तपासणी करुन घ्या असे अवाहन करणेत आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








