ऑनलाईन टीम / मुंबई :
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना मुंबईतील दोन फ्लॅटची माहिती लपवली होती. याप्रकरणात बच्चू कडू यांना अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील दोन फ्लॅट्सची माहिती लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला. दोन महिने सश्रम कारावासासह 25, 000 रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.