प्रतिनिधी /वास्को
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी वास्कोत आपले ग्रामदैवत श्री दामोदराचे दर्शन घेतले. यावेळी उद्योजक प्रशांत जोशी व श्री दामोदर भजनी सप्ताह समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर व पदाधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. श्री दामोदर मंदिराचे पुरोहित भूषण जोशी यांनी याप्रसंगी श्रीचरणी सार्वजनिक गाऱहाणे घातले. प्रशांत जोशी यांनी यावेळी राज्यपाल आलेंकर यांचा यावेळी सन्मान केला. देवाकडे सर्वांसाठी आशिवार्द मागताना आर्लेकर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये काही भागात ओढवलेल्या नैसर्गीक आपत्तीचा उल्लेख करून झालेल्या जीवीत व वित्त हानीबद्दल दुख व्यक्त केले व हिमाचल प्रदेशला या आपत्तीपासून मुक्त करण्याचे मागणे देवाकडे मागले.









