कोल्हापूरच्या सुपुत्राचा सन्मान, पन्नासहून अधिक मराठी, इंग्रजीतील गंथांचे लेखन
प्रतिनिधी / कोल्हापूर
सम्राट शिवाजी या प्रसिद्ध गंथाचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक व संस्कतीविषयक अभ्यासक म्हणून ख्याती असणाऱया प्रा. डॉ. आनंद पाटील यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शित्तुर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) हे मूळ गाव असणाऱया डॉ. पाटील यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखन केले आहे. त्यांचे इंग्रजी आणि मराठी भाषेतील लेखन प्रसिद्ध आहे.
डॉ. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य व साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मिळालेल्या 12 लाखाच्या अनुदानातून त्यांनी सांस्कृतिक मीमांसा' या विषयावरील तीन खंडांचे लेखन पूर्ण केले आहे. ते गोवा व नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभाग प्रमुख होते. त्यांनी मराठीत 38 व इंग्रजीत बारा गंथ लिहिले आहे. त्यांना सतरा पुरस्कार मिळाले आहेत. संस्कृती अभ्यासक म्हणून म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत
सम्राट शिवाजी’च्या अपूर्व यशानंतर ते `सम्राट माता जिजाऊ’ या गंथाचे लिहीत आहेत. त्यांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे
.