प्रतिनिधी /पणजी
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची सदीच्छा भेट घेतली आणि सुमारे तासभर चर्चा केली.
दोघेही राज्यपाल नव्याने नियुक्त झालेले असून हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर आर्लेकर हे सध्या गोव्यात आले आहेत. त्यांनी दोनापावला येथील राजभवनवर जाऊन पिल्लई यांच्याशी चर्चा केली. त्यात गोव्यातील विविध विषयांचा समावेश होता. आर्लेकर हे 28 जुलै रोजी हिमाचल प्रदेशाकडे रवाना होणार आहेत.








