वार्ताहर /धामणे
राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातून बुधवार दि. 5 रोजी दसरा उत्सव पालखी सोहळा सवाद्य मिरवणुकीने राजहंसगडावरील देवस्थानी पंचकमिटी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिकरीत्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता गडावरून सुरुवात होऊन संध्याकाळी 7 वाजता गावात पालखी मिरवणूक दाखल झाली. त्यानंतर राजहंसगड गावातील प्रत्येक गल्लीत आरती ओवाळल्या. सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. त्यानंतर गावातील सिद्धेश्वर मंदिर आवारात सोहळय़ाची सांगता झाली. पालखी सोहळय़ात देवस्थान पंच कमिटी, युवक वर्ग, वडीलधारी, महिला व बालचमूंसह मोठय़ा संख्येने भाग घेतला होता. पारंपरिक वारसा जपणारी ही भव्य मिरवणूक गावात यात्रेचे स्वरुप आले होते.
‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी’ या जल्लोषी घोषणांनी सिद्धेश्वर मंदिर आवारात ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.









