प्रतिनिधी / बेळगाव
राजहंसगड, ता. बेळगाव येथील एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
रुक्मिणी मल्लाप्पा मोरे (वय 55) रा. राजहंसगड असे तिचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या एक महिन्यापासून तिची मानसिक अवस्था बिघडली होती. याच अवस्थेत तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुक्मिणी पती मल्लाप्पा समवेत शेताला गेली होती. ती लवकर घरी परतली. पाठोपाठ 5.30 वाजण्याच्या सुमारास पती मल्लाप्पा घरी परतला त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागारात हलवला.









