प्रतिनिधी/ बेळगाव
सुळगा (ये) ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱया राजहंसगड येथे ग्राम विकास आघाडीने आपली परंपरा कायम ठेवून पुन्हा विजय मिळविला आहे. शाम थोरवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. राजहंसगड येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून सुमित्रा तावशे 297, जोतिबा थोरवत 305 घेवून तर वॉर्ड क्रमांक 3 मधून लक्ष्मी तावशे या 309 मते घेवून विजयी झाल्या आहेत. यावेळी निवडून उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









