जयपूर / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने दिवाळीमध्ये फटाके आणि ऍटमबॉम्बवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजस्थानमध्ये फटाक्मयांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी असेल. फटाक्यांमुळे राज्यात प्रदूषण पातळी वाढल्यास कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवणार असल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्मयांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. फटाक्मयांमधून निघणाऱया विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होण्याचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच दिल्यामुळे फटाकेबंदीची सुसज्जता पाळली जात आहे.









