प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारीमुळे सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकारने काही प्रमाणात निर्बंध हटविण्यास प्रारंभ केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील बंद असलेली काही मंदिरे सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी चालू झाली आहे. राजधानी पणजी आणि परिसरातील अनेक मंदिरे भक्तांना खुली करण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात आले आहे.
पणजीतील मळा येथील मारुती मंदिर, विठोबा मंदिर, भाटलेतील सटी भवानी मंदिर, साईबाबा मंदिर, राम मंदिर, चिंचोळेतील दत्त मंदिर, सांतीनेज येथील सिद्धीविनायक मंदिर, बोक द व्हाक येथील साई मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर, महादेव मंदिर, गणेश मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मिरामार येथील मारुती मंदिर, कांपाल येथील गणेश मंदिर, पणजी बसस्थानकाजवळील मारुती मंदिर, यांचा त्यात समावेश आहे.









