प्रतापसिंह राणे यांचे उद्गार : काँग्रेस दिन कार्यक्रमात नेत्यांना दिल्ला धक्का
प्रतिनिधी /पणजी
ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी राजकारणात आपण 50 वर्षे पूर्ण केलेली आहेत. आता घरी बसून नव्या व उभरत्यांना संधी देण्याची गरज व्यक्त करुन आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचे संकेतच दिले.
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित समारंभात काँग्रेस पक्षाने त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, आपण राजकारणातील 50 वर्षे पूर्ण केली. आपल्यासारखेच अन्य कोणी 50 वर्षे पूर्ण केलेली असतील तर त्यांनी देखील आता निवृत्ती स्वीकारुन नव्या दमातील युवा वर्गाला संधी द्यावी. आपण राजकारणात 50 वर्षे पूर्ण केली. आता इथे थांबण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. राणे यांच्या विधानाने काँग्रेसच्या सर्वच उपस्थित नेत्यांना धक्का बसला. काँग्रेसने गेल्याच आठवडय़ात राणे यांना पर्ये मतदारसंघात उमेदवारी दिली होती.









