प्रतिनिधी/ मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेमध्ये काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या सभेत ठाकरे यांनी राज्यात नवे उद्योsग येताना दिसत नाहीत, बेरोजगारी वाढली. विद्यार्थी सरकारकडे बघतात, सरकार कोर्टाकडे बघते, असे चित्र मी या अगोदर कधीही पाहीले नव्हते. ही परिस्थिती पाहता आताच्या आता विधानसभा निवडणुका घेऊन टाका, काय तो सोक्षमोक्ष लावा. जो राजकारणाचा चिखल तुम्ही केलाय ना, लोक तुमच्याच तोंडात तो चिखल नक्की घालतील, असे खडे बोल त्यांनी राजकारण्यांना सुनावले .
राज यांची गुढीपाडव्या निमित्त बुधवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेत कशा प्रकारे राजकारण चालू होत हे सांगताना सध्याच्या सरकारला काही सुचना केल्या. मला शिवसेनाप्रमुखपद आणि पक्षप्रमुख पद हवे होते असे सांगितले जाते. पण हे खोटे आहे. माझ्या स्वप्नातही हे पद नव्हते. धनुष्य हे शिवधनुष्य होते. ते फक्त बाळासाहेबांनाचा पेलणारे होते. कुणालाही ते पेलणारे नाही. एकाला झेपले नाही दुसऱ्याचे काय होईल हे माहीत नाही. तेव्हा जो कट शिजत होता त्याचा सत्तांतरादरम्यान शेवट झाला. मी पक्ष सोडताना बोललो होतो ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार आणि मला त्यात वाटेकरी होण्याची इच्छा नव्हती म्हणून मी पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले.
जे बोलले त्यांची अवस्था काय?
राज ठाकरे म्हणाले, शिवतीर्थाचा कोपरा न् कोपरा भरला. अनेकांनी सांगितले होते की, हा संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय? आज महाराष्ट्रातील दोन वर्षांची राजकीय स्थिती पाहत आहोत.
धनुष्यबाण गेल्याने मला वेदना होत होत्या
राज ठाकरे म्हणाले, दोन वर्षांत राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला हे सर्वच आपण पाहत आलो आहोत. हे सर्व राजकारण पाहत असताना वाईट वाटत होते. पण ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझे की, माझे असे चालू होते तेव्हा वेदना होत होत्या. लहानपणापासून मी तो पक्ष (शिवसेना) जगलो, पाहत आलो आहे. बालपणापासून माझ्या शर्टाच्या एका बाजूला वाघाचे चित्र असायचे.
मतदारांनी विचार करण्याची गरजा
सेना भाजपने 2019 ला एकत्र निवडणूक लढविली. महाराष्ट्रातल्या मतदारांनी उन्हातान्हात युतीला मतदान केल्यानंतर यांचे खेळ सुरू झाले जेव्हा यांना कळले की आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही. त्याचा फायदा घेत अडीचवर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली. चार भिंतीत अमित शहांनी सांगितल्याचे सांगतात मग जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी तुमच्यासोबत सभा घेत असताना पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल बोलत होते तेव्हा आक्षेप का नाही. ज्या लोकांनी युती म्हणून मतदान केल त्यांचे काय. त्याच्यासाठी मतदान करता का तुम्ही, असा सवाल राज ठाकरे यांनी मतदारांना केला.
महिन्याभरात हे तोडले नाही तर बाजूला मोठे गणपती मंदिर बांधणार
मगदुमबाबाच्या दर्ग्यासमोर माहीम समुद्रामध्ये दिवसाढवळ्या समुद्रामध्ये नवीन हाजीअली तयार होत आहे. माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त यांना एकच सांगणे आहे जर महिनाभरात जर हे तोडले गेले नाही तर त्याच्याबाजूला सर्वात मोठे गणपती मंदीर आम्ही उभे केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना सरकारला दिला.
उद्धवशी केली होती चर्चा
मी एक दिवस उद्धवकडे गेलो आणि त्यालासोबत घेऊन हॉटेल ओबेरॉयमध्ये गेले होते समोरासमोर बसुन तुला काय हव पक्षाचा अध्यक्ष व्हायच उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायच तो हो बोलला मग मी विचारले मग माझे काम काय इतके सांगता मला फक्त प्रचारला बाहेर काढू नका असे सांगितले ठरले हे सगळ ठरल्याचे बाळासाहेबांना सांगितल्यानंतरही बाळासाहेबांनी उद्धवला बोलवले मात्र तो बाहेर निघून गेल्याचे सांगितले.हे मी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे सभा घेत फिरू नका
जुनमध्ये अलिबाबा आणि चाळीसजण ह्यांना कंटाळून गेले कोरोना काळात एक आमदार भेठायला गेले होते त्याच्या मुलाला बाहेर ठेवले का तर कोरोना झाला तर मग आता अचानक बाहेर निघायला लागले, महाराष्ट्र लुटुन सुरतला गेलेले शिंदे हे पहीले मात्र त्यांना एकच सांगणे आहे उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतात तिकडे जाऊन सभा घेऊ नका तुम्हाला गुंतवुन ठेवतील तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात सरकारी कर्मचार्यांची पेन्शन ,शेतकरी विषय असताना आपण सभा काय घेता जनतेला भेटा असा सल्ला राज यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
मला जावेद अख्तरांसारखा मुसलमान हवा
राज ठाकरे म्हणाले, मला धर्मांध हिंदु नको. दुसर्या धर्माचा मान राखेल असा हिंदू हवा. मला माणसे हवे, मुस्लिम धर्मातील माणसे हवी मला जावेद अख्तरांसारखी माणसे हवे. देशातील कोणत्याही नागरीकाने पाकिस्तानात जावून खडे बोल सुनावले नाही पण जावेद अख्तरांनी हे काम केले असल्याचे सांगत त्यांनी त्यांचा व्हिडीओ दाखवला
मशिदीवरील भोंगे बंद करा
राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आज शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार आहेत तर मी गुढीपाडव्याच्या मागच्या वर्षी झालेल्या सभेत सांगितले होते की, मशिदीवरील भोंगे बंद करा, त्याचे काय? पहिले म्हणजे माझ्या मनसे कार्यकर्त्यांवर गेल्या सरकारच्या काळात सतरा हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले ते रद्द करा. दुसरा निर्णय म्हणजे मशिदीवरील भोंगे बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. दोन पैकी एक निर्णय मान्य करावाच लागेल. मी विषय सोडला नाही, सोडणारही नाही.
सांगलीतील विषयाकडे लक्ष द्या.
मिरग मिरज कुपवाड येथील मंगलमुर्ती कॉलनी जवळील जागेवर अतिक्रमण कऊन तेथे मशिद बांधली जात आहे,तेथील मुस्लिम समाज एकत्र येऊन झुंडशाहीने हिंदुना त्रास देत आहे,याची पोलीसांनी देखील दखल घेतली नाही तरी याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दखल घ्यावी असे राज यांनी सांगितले.एकनाथ शिंदे -फडणवीस आल्यानंतर प्रतापगड येथील कबरीचे अनधिकृत बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले.









